शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय दिरंगाईमुळे दोन महिन्यांचे वेतन रखडलेले जि.प.चे साडेतीन हजार शिक्षक आर्थिक विवंचनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:49 IST

teacher News: तनासाठी एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या वेतनासाठी वेतन आर्थिक तरतूद प्राप्त झाली असतानाही प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय दिरंगाई व निष्काळजीमुळे वेतन रखडले असल्याचा आरोप शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे.

ठाणे - येथील जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे ग्रामीण, दुर्गम भागातील एक हजार 328 प्राथमिक शाळांचे तब्बल तीन हजार 737 शिक्षक, मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक आणि केंद्र प्रमुख आदींचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले असून प्रशासनाच्या मनमानी विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.

या वेतनासाठी एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या वेतनासाठी वेतन आर्थिक तरतूद प्राप्त झाली असतानाही प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय दिरंगाई व निष्काळजीमुळे वेतन रखडले असल्याचा आरोप शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. या वेतन समस्येची गंभीरबाब पदाधिकारी व अधिका:यांच्या निदर्शनात आणून दिलेली असतानाही त्यांवर अद्यापही गांभीर्याने विचार केला जात नसल्यामुळे प्राथमिक शिक्षकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याविरोधात शिक्षक संघटना एकत्र येऊन प्रशासनाच्या मनमानी व निष्काळी विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.

शिक्षकांनी या आधी वेळोवेळी आंदोलने करून प्रत्येक एक तारखेला वेतन देण्याची मागणी शासनाकडून मंजूर करून शासन निर्णयही जारी करून घेतले आहेत. त्यात उशिरा वेतन झाल्यास संबंधित अधिका:यांना जबाबदार धरून कडक कारवाई करण्याचे आदेश असतानाही आदेशाची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या या मनमानी व दुर्लक्षितपणामुळे गेल्या मार्च महिन्याचे वेतन मे महिन्यात अदा करण्यात आले. तर आताही एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या वेतनास दिरंगाई झाल्यामुळे शिक्षक आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

दर एक तारखेस मिळणारे वेतन तब्बल दोन, दोन महिने विलंबाने होत असल्याने या शिक्षकांचे आर्थिक गणित पार कोलमडले आहे. या अनेक शिक्षकांचे गृह व इतर कर्जाचे हप्ते थकले आहेत. अधिक व्याजाचा भरूदड जिल्ह्यातील या शेकडो शिक्षकांना बसत आहे. त्यात काहींचे कुटूंब कोरोनाच्या चक्रव्युहात सापडले आहे. तर काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यात या आर्थिक समस्येमुळे वैद्यकीय उपचाराच्या बिलांची रक्कम वाढल्यामुळे या गंभीर आजारपणात प्रशासनाच्या निष्काळजीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व ग्रामस्थांनी लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आदी कामांसाठी शिक्षक आरोग्य विभागाच्या संगतीला सध्या सक्रीय आहे. एप्रिल, मे महिन्यांची सुटी या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ‘मिशन मोड अंतर्गत कामासाठी खर्ची घातली आहे. त्यासाठीही त्यांना ना विमा संरक्षण, ना प्रतिबंधात्मक साधनांची उपलब्धता तरीही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. कोरोना लस विरोधातील गैरसमज दूर करीत आहेत. बाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आदी सर्व कामे शिक्षक करीत असतानाही वेतनापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप शिक्षकांकडून ऐकायला मिळत आहे.शिक्षकांचे वेतन रखडले, हे खरे आहे. पण शिक्षकांच्या या वेतनासाठीआर्थिक तरतूद नसल्यामुळे ते वेळेवर होऊ शकले नाही. पण आता तरतूद आली आहे. ट्रेझरीत बील टाकले आहे. सोमवारी किंवा मंगळवारी शिक्षकांचे वेतन नक्की होईल.- सुभाष पवारउपाध्यक्ष- जि.प. ठाणो

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रthaneठाणे