शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर तिघांनी लुबाडले, आरोपींमध्ये एक बालगुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:02 IST

नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सीताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले.

ठाणे : नवी मुंबईच्या एका पोस्टमनला चाकूच्या धाकावर लुटणाºया एका बालगुन्हेगारासह तीन आरोपींविरुद्ध नौपाडा पोलिसांनी बुधवारी गुन्हे दाखल केले. या त्रिकुटाने एकाच रात्री तीन गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सीताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. त्या वेळी तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांना धमकावले. त्यांची मोटारसायकल, दोन मोबाइल फोन आणि ९ हजार रुपये रोख असा ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन तिन्ही आरोपी पसार झाले. या प्रकारामुळे हादरलेल्या पुजारी यांनी कसेबसे नौपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत यांनी घटनेचा संदेश तत्काळ वायरलेसवर देऊन यंत्रणेला सतर्क केले. बुधवारी सकाळी नितीन कॅडबरी चौकात नादुरुस्त मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या एका मुलाला पोलिसांनी हटकले. मोटारसायकलला नंबरप्लेट नसल्याने पोलिसांना संशय आला. चौकशी केली असता ती मोटारसायकल तक्रारदार पोस्टमनची असल्याचे समजले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असता त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासोबतच्या दोन्ही आरोपींची नावे मिळाली असून त्यापैकी एक जण कोपरी येथील पारशीवाडीचा, तर दुसरा वर्तकनगरचा रहिवासी आहे. ते दोन्ही आरोपी बालगुन्हेगार आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश राऊत यांनी सांगितले.त्या पोस्टमनला चाकूच्या धाकावर लुटल्यानंतर चोरीच्या मोटारसायकलने आरोपींनी वर्तकनगर आणि राबोडी परिसरांत अशाच स्वरूपाचे आणखी दोन गुन्हे केल्याची माहितीही समोर येत आहे.मोबाइलही गुन्हेगारांकडे-पोस्टमनचे दोन्ही मोबाइल फोन आणि रोकड बालगुन्हेगारांच्या साथीदारांकडे असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दोन्ही आरोपी बालगुन्हेगार आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा