शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलसह तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:07 IST

आरोपींना पुढील चौकशी व तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विनापरवाना विक्री करण्यासाठी पिस्तुलीसह आलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले आहे. आरोपींकडून पोलिसांनी पिस्तुल, मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे आणि वेगनॉर कारसह हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे.

मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे सपोनि सुहास कांबळे यांना माहिती मिळाली की, काही आरोपी पिस्तुल विक्री करण्यासाठी एक वेगनॉर कारमधून नालासोपारा पश्चिमेकडील साई सिटी लगत असलेल्या खारटन परिसरात येणार आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी व अंमलदारानी सापळा रचून कारसह  आरोपी अब्दुल शेख (२६), सद्दाम शेख (२३) आणि राजकुमार गौतम (२४) या तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची झडती घेतल्यावर एक पिस्तुल, मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे भेटली. पोलिसांनी वेगनॉर कारसह ३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अंमलदार सुमित जाधव यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पुढील चौकशी व तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोहवा मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी