नालासोपारा (मंगेश कराळे) :- ५० लाख रुपये किंमतीचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या ३ आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.
पोलीस आयुक्त यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार जगदिश गोवारी व सचिन पाटील या दोघांना माहीती मिळाली की, शनिवारी रात्रीचे वेळी तुळींजच्या सेंट्रल पार्क मैदान येथे तिघे आरोपी मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्याप्रमाणे युनिटचे पोलीस अधिकारी व अंमलदाराचे पथकाने सापळा रचून त्याच दिवशी रात्रीच्या वेळी तिघांना ताब्यात घेतले. पंचांचे समक्ष घेतलेल्या अंगड़ाडतीत ५० लाख रुपये किंमतीचा २५० ग्रॅम मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ मिळून आल्याने अटक केली आहे.
शहबाज हमिद शेख (२२), योगेश राजू राठोड (२२) आणि जाफर आसिफ शेख (२२) ही तिन्ही आरोपींची नावे आहेत. आरोपीकडून मिळालेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणामकरणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस अॅक्ट) कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि सोपान पाटील, पोउनिरी संतोष घाडगे आणि अजित गिते, सहाफौज संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहूल कर्पे, प्रशांत ठाकूर, दिलदार शेख, अनिल साबळे, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सायबर शाखेचे सफौज संतोष चव्हाण यांनी केली आहे.