शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भाजपा पुरस्कृत नगरसेवकाविरुद्ध विनयभंगासह धमकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 21:51 IST

ठाणे महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक विलास कांबळे याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडित महिलेने पुन्हा त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आता विनयभंगासह धमकीचा गुन्हा सोमवारी दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे लैंगिक अत्याचार झालेल्या पिडितेने केला आरोपठाणे न्यायालयाच्या आवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील इंदिरानगर भागातील ठाणे महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक विलास कांबळे याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडित महिलेने पुन्हा त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आता विनयभंगासह धमकीचा गुन्हा सोमवारी दाखल केला.या घटनेतील पीडित महिला बारमध्ये सिंगर असून ती सावरकरनगर येथे वास्तव्याला आहे. कांबळे यांनी तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करून कांबळेसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध १ सप्टेंबर २०१९ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित महिला २३ डिसेंबर रोजी आपल्या बहिणीसह या गुन्ह्यासंदर्भातील न्यायालयीन कामासाठी ठाणे न्यायालय परिसरात आली होती. त्यावेळी कांबळे याने पीडित महिलेकडे पाहून अश्लील वर्तन केले. याचा जाब विचारण्यास तिची बहिण गेली असता कांबळे यांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिने आणि बहिणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात कांबळेंविरुद्ध विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे नगर पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग