शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर

By जितेंद्र कालेकर | Updated: December 13, 2017 23:30 IST

शस्त्रक्रियेसाठी एचआयव्हीची तपासणीही आवश्यक असल्याचे एकीकडे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे तिची तपासणीच अन्यत्र करण्यास फर्मावण्यात आल्यामुळे रुग्णांची चांगलीच फरफट होत आहे.

ठळक मुद्देसेवानिवृत्त पोलीस हवालदारालाही बसला फटकाशस्त्रक्रियेसाठी एचआयव्हीची तपासणी आवश्यक तपासणीच होत नसल्याने रुग्णांची फरफट

जितेंद्र कालेकरठाणे : कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची तपासणी अभावी ससेहोलपट होत असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. ‘एचआयव्ही’ची तपासणी करणारा तंत्रज्ञच उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरी परतावे लागल्यामुळे रुग्णांनी नाराजी व्यक्त केली.ठाण्याच्या लुईसवाडीतील ६७ वर्षीय अशोक परब हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालयात आले होते. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना रक्ताच्या विविध चाचण्या तसेच साखरेचे प्रमाणही तपासण्यास सांगण्यात आले. बुधवारी सकाळी उपाशीपोटी आणि नाष्टयानंतर अशा दोन्ही तपासण्या केल्या. त्यानंतर त्यांना ‘एचआयव्ही’ची तपासणीही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. परब यांच्यासह २५ रुग्ण या तपासणीसाठी त्या कक्षामध्ये गेले तेंव्हा तेथील कक्षाचा दरवाजा बंद होता. रुग्णांनी विचारपूस केल्यानंतर ही तपासणी करणा-या संबंधित कर्मचा-याला गेल्या चार दिवसांपासून मंत्रालयात कामकाजासाठी पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णांनी ठाणे महापालिकेच्या टेंभीनाका येथील वाडिया रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे फर्मान तेथील कर्मचा-यांनी सोडले. आता शस्त्रक्रियेसाठी ही तपासणी आवश्यक असल्यामुळे परब यांच्यासह २० ते २५ रुग्ण वाडिया रुग्णालयात आले. तिथे गेल्यावरही तेथील कर्मचा-यांनीही सहकार्याऐवजी ‘आमचे सिव्हील रुग्णालयाशी बोलणे झाले आहे, त्यामुळे तुम्ही तिथूनच या तपासण्या करा, इथे या तपासण्या होणार नाहीत,’ असे तेथील कर्मचा-यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे सर्व रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. तिथे ही तपासणी करणारे कोणीही उपलब्धच नव्हते. त्यामुळे परब यांच्यासारख्या अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालय ते वाडिया अशी पायपीट करूनही तपासण्या न झाल्यामुळे केवळ मन:स्ताप सहन करावा लागला. अनेक रुग्णांनी त्यावर संताप व्यक्त केला. दरम्यान, रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी मात्र कर्मचाºयाला कोठेही पाठविले नसल्याचे सांगून कर्मचाºयांचा तुटवडा असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. या रुग्णांनी मला भेटून हे सांगायला हवे होते. पण त्यांची गुरुवारी सकाळी तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘‘ आता डोळयावरील शस्त्रक्रिया एकवेळ एक दोन दिवस लांबविताही येईल, पण आणखीही काही गंभीर रुग्ण असतील तर त्यांनाही या तपासणीअभावी परत पाठविले जात होते. गंभीर आजारावरील रुग्णांची एचआव्हीच्या तपासणीअभावी जर अशी ससेहोलपट होत असेल तर हे गंभीर आहे. यावर रुग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दखल घेणे आवश्यक आहे.’’अशोक परब, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, ठाणे‘‘ मंत्रालयात किंवा अधिवेशनासाठी या रुग्णालयातून कर्मचारी पाठविलेला नाही. कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल.संबंधितांची चौकशी करण्यात येईल.’’डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल