शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

ठाणे जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 17:55 IST

जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तालुका पातळीवर शेतकऱ्यांना ४ हजार मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजागतिक मृदा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात तालुका पातळीवर शेतकऱ्यांना ४ हजार मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येणार.१ लाख २७ हजार ९०८ पत्रिका तयार करण्याचे उद्दिष्ट्य असून आत्तापर्यंत सुमारे ५० हजार पत्रिका वाटप झालेशेतकऱ्यांना विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

ठाणे - जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तालुका पातळीवर शेतकऱ्यांना ४ हजार मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख २७ हजार ९०८ पत्रिका तयार करण्याचे उद्दिष्ट्य असून आत्तापर्यंत सुमारे ५० हजार पत्रिका वाटप झाले आहे. या दिवशी शेतकऱ्यांना विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव,एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे. म्हणून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला २ वर्षातून एकदा मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. यात किती प्रमाणात कोणते खत त्या जमिनीसाठी वापरावे तसेच कोणती पिके घ्यावी हे नमूद केलेले असते. या कार्यक्रमाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीthaneठाणे