शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र टाकीपठार येथे हजारो भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 05:40 IST

२० हजार भाविकांची उपस्थिती : उपक्रमशील सत्संग केंद्रांचा गौरव

किन्हवली : तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यातील गावागावांतून आलेल्या दिंड्या, राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि हजारो सत्संगप्रेमींच्या हर हर महादेव अशा गर्जनांनी शहापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थान रविवारी भक्तिरंगात रंगून गेले होते. निमित्त होते ब्रह्मलीन योगी ऋद्धिनाथबाबा सत्संग परिवाराच्या पाचव्या वर्धापन दिनाचे.

शहापूर, मुरबाड, कल्याण, कर्जत, ठाण्यासह नाशिक तसेच नगर जिल्ह्यांत आध्यात्मिक मार्गदर्शनासोबत सामाजिक हिताचे उपक्र म राबवत भक्तिमार्गाचा प्रसार करणाºया ऋद्धिनाथबाबा सत्संग परिवाराचा महासत्संग मेळावा रविवारी श्रीक्षेत्र टाकेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता. टाकीपठारचे सिद्धयोगी ब्रह्मलीन सद्गुरू ऋद्धिनाथबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आणि सत्संग परिवाराचे प्रणेते योगी फुलनाथजीबाबा यांचे विचार ऐकण्यासाठी सुमारे २० हजार भाविक मेळाव्यानिमित्ताने उपस्थित होते. यावेळी शहापूर तालुक्यातील सत्संग केंद्रे चांद्रीचापाडा, नांदवळ आणि मुरबाड तालुक्यातील कोलठण (ठाकरेनगर), शिंदीपाडा (बोरगाव) या उपक्रमशील केंद्रांना योगी रामनाथबाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

वनराई बंधारे बांधणाºया ११ सत्संग केंद्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गायक गंगाराम ढमके यांच्या भक्तिसंगीताने भाविकांची मने जिंकली. मानेखिंड गावातील तरुणांनी हजारो वाहनांसाठी केलेली नियोजनबद्ध पार्र्किं गव्यवस्था, काही भक्तांनी भाविकांसाठी केलेला शिरा, मिठाई, ताकवाटप तसेच पाण्याची सोय, ५०० स्वयंसेवकांनी केलेली भोजनव्यवस्था या सर्वांतून अनोख्या शिस्तीचे दर्शन उपस्थितांना घडले.याप्रसंगी टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथबाबा, पीरजी योगी भगवती नाथबाबा, बालयोगी गोपीनाथबाबा, योगी अलखनाथबाबा आणि साधूसंतांसह पंढरपूरच्या मुमुक्षू पाठशाळेचे शास्त्री आदी उपस्थित होते.नेत्यांचीही उपस्थितीच्वेदान्ताचार्य मारु ती महाराज भांगरे, प्रमोद लांबे महाराज, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार पांडुरंग बरोरा,दौलत दरोडा, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे, राजेश विशे, विकास गगे यांच्यासह सर्वच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण