शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा पक्षप्रवेश 

By धीरज परब | Updated: October 14, 2022 16:01 IST

त्यातील दोघांना  २०१९ मध्येच तर एकास वर्षभरा पूर्वीच भाजपात प्रवेश दिला असताना त्यांचा पुन्हा पक्ष प्रवेश घडवून आणल्याने खिल्ली उडवली जात आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर मधील शिवसेनेच्या ३ व काँग्रेसच्या १ माजी नगरसेवकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश ओबीसी सेलच्या कार्यकारणी बैठक वेळी प्रदेश कार्यालयात शुक्रवारी पक्ष प्रवेश देण्यात आला . मात्र त्यातील दोघांना  २०१९ मध्येच तर एकास वर्षभरा पूर्वीच भाजपात प्रवेश दिला असताना त्यांचा पुन्हा पक्ष प्रवेश घडवून आणल्याने खिल्ली उडवली जात आहे . 

भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यक्रमात मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश शुक्रवारी करण्यात आला . भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या वतीने शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपा मध्ये पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे . 

वास्तविक हे सर्व माजी नगरसेवक असून त्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविका अनिता पाटील , दीप्ती भट व कुसुम गुप्ता तर काँग्रेसचे माजी नगरसेवक नरेश पाटील यांचा समावेश आहे . या पक्ष प्रवेश वेळी मेहतांसह मंत्री रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते . 

यातील अनिता पाटील व नरेश पाटील यांचा भाजपा प्रवेश मार्च २०१९ मध्येच झालेला असून स्वतः मेहतानीच त्यांना पक्ष प्रवेश दिला होता . तर दीप्ती भट सुद्धा वर्षभरा पेक्षा जास्त काळा पासून भाजपा सेबत आहेत . 

भट , पाटील ह्या भाजपाच्या कार्यक्रमात असतात व भाजपा म्हणूनच स्वतःची ओळख देतात .  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत  त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा सुरु करण्यात आली होती . 

मुळात दीप्ती भट ह्या काँग्रेस मधून नगरसेविका झाल्यावर भाजपात गेल्या . भाजपातून नगरसेविका झाल्यावर शिवसेनेत गेल्या आणि सेनेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर पुन्हा भाजपात गेल्या . अनिता पाटील सुद्धा राष्ट्रवादीतून शिवसेना व सेनेतून भाजपात आल्या आहेत . तर नरेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस व तेथून भाजपात आले आहेत . 

शिवसेनेच्या माजी नगरसेविका कुसुम गुप्ता ह्या सेनेत फूट पडल्यावर शिंदे गट व ठाकरे गट असे दोन्ही कडे पाय ठेऊन होत्या . मात्र त्यांना  भाजपा कडे ओढण्यात मेहता यशस्वी झाले . वास्तविक कुसुम यांचा भाजपा प्रवेश हा शिवसेना शिंदे गटाला जास्त धक्का देणारा मानला जात आहे .  

दरम्यान चार वर्षां पूर्वी भाजपात प्रवेश दिलेल्या अनिता पाटील व नरेश पाटील तर वर्षभरा पासून भाजपात असलेल्या दीप्ती भट यांना नवीन प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा भाजपात प्रवेश दिल्याने खिल्ली उडवली जात असून टीका देखील होत आहे . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayanderमीरा-भाईंदर