शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रोजगार वाढतील अश्या मागण्या नागरी चळवळीने केल्या पाहिजेत -  डॉ.आनंद करंदीकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 15:24 IST

विषमता निर्मूलन व रोजगार निर्मिती या विषयावर झालेल्या कार्यक्रमात विनायक पंडित, सरिता आव्हाड व डॉ.आनंद करंदीकर यांनी आपले विचार व्यक्त केले

ठळक मुद्देविषमता निर्मूलन व रोजगार निर्मिती या विषयावर कार्यक्रमरोजगार वाढतील अश्या मागण्या नागरी चळवळीने केल्या पाहिजेत -  डॉ.आनंद करंदीकर  शेतीतील महिलांचे प्रमाण यांत्रिकीकरणामुळे कमी झाले - सरिता आव्हाड

ठाणेबेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पण आशेच्या बेड्या पायात अडकवल्या की युवक युवती पळायला लागतात. आज तीच पळण्याची स्पर्धा सर्व गावात व शहरात सुरू आहे. परिस्थिती गंभीर आहे पण केवळ गंभीर आहे म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. आपणच ते प्रयत्न करायला हवेत. तरुणांच्या रोजगारासाठी आपली सारी कल्पनाशक्ती विचारपूर्वक लावून नवीन क्षेत्रे तपासणे व त्यावर रोजगार वाढतील अश्या मागण्या करत रहाणे गरजेचे आहे असे मत डॉ.आनंद करंदीकर यांनी व्यक्त केले 

     विषमता निर्मूलन व रोजगार निर्मिती या विषयावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, डॉ.आनंद करंदीकर म्हणाले, जे चालले आहे ते ठीक चाललेले नाही म्हणून कृती करण्याची गरज आहे. हा विषय तरुणांच्या चर्चेत ठरला. विकासाचा दर कीती लोक श्रम करतात यावर ठरते। आपल्याकडे २०२० साली काम करू शकणाऱ्या तरुणांची संख्या सर्वात जास्त भारतात असणार आहे. म्हणून २ कोटी नोकऱ्या व रोजगार संधी मिळणार हे सरकार सांगत आहे. सर्व पक्षांना हे माहीत आहे. पण आपल्याकडे नूसती उत्पादक श्रम करणारी शक्ती असून फायदा नाही तर त्यांना उत्पादक श्रम करण्याची संधी मात्र शहरात व ग्रामीण भागात कमी करत आहोत. साधारण १९९० पासून सुरू झाले आहे. म्हणून छोट्या मागण्या घेऊन आपण रोजगार वाढेल अश्या मागण्या आपण करायला हव्यात. उदा. यापुढे गटारात माणूस उतरून स्वच्छता करणार नाही. हे काम यंत्राद्वारे करा. म्हणजे यातून आधुनिक रोजगार निर्माण करता येतील. ही आपली जबाबदारी आहे. शेतीत गुंतवणूक करण्याची गरज आहे. जनावरांची विष्टा तपासण्याची यंत्रणा असणे गरजेचे आहे.  राज्यात किमान २५ हजार रोजगार निर्माण होतील. या करता त्या यंत्रावर गुंतवणूक करण्याची गरज आहे. असे अनेक उपाय रोजगार निर्माण करण्यासाठी करता येतील.  विनायक पंडित म्हणाले, सामाजिक विषमतेबाबत स्त्री पुरुष विषमता व  जाती व्यवस्थेमुळे निर्माण होणारी विषमता हा ही एक पैलू आहे. या विविध जातींच्या रोजगाराच्या संधि कमी कमी होत आहेत. धर्माच्या आधारे ही विषमता असून तेथेही रोजगार कमी होतोय. रोजगारासाठी भांडवल, शिक्षित श्रम करणारा वर्ग, (मनुष्यबळ) मागणी. हे तीन घटक महत्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नामुळे देशातील उत्पन्न वाढलेले आहे. दारिद्ररेषे खालील २४ कोटी जनता ही बरे व स्थायी जीवन जगायला लागली. देशात भांडवलाची कमी नाही. भांडवल लपवले जाते हा आपल्या देशातील एक घातक प्रकार आहे. असे भांडवल लपवल्याने ते उत्पादक प्रक्रियेत गुंतवले जात नाहीत ही चिंताजनक बाब आहे. औद्योगिक क्षेत्रात ४० % उत्पादन लघु उद्योगात होते. शेतीचे उत्पन्न जिडीपीत १७ % आहे. सरिता आव्हाड म्हणाल्या, शेती मधील व एकूण अर्थकारणातून महिलांचे प्रमाण ५४ % वरून ३६% इतके कमी झाले आहे. शहरी भागात ते २७% आहे. पण शिक्षणाचे प्रमाण तर खूप वाढत आहे. मग हे रोजगाराच्या क्षेत्रात वा अर्थकारणात या स्त्रिया कुठे जातात? अर्धशिक्षित महिलांना रोजगार आहेत वा पदवीधर महिलांना रोजगार आहे पण पदवी खालील शिक्षण घेतलेल्या महिलांना रोजगार नाही. तर त्यानी गृहिणी म्हणून कर्तव्य बजवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. महिलेचे अधिक वरच्या जागेवर जाणे यास घरातून व समाजातून संधी चा अवकाश प्राप्त होणे गरजेचे आहे. शेतीतील महिलांचे प्रमाण यांत्रिकीकरणामुळे कमी झाले. यास पुरुषी मानसिकता जबाबदार आहे. यंत्र फक्त पुरुषच चालवू शकतो ही ती मानसिकता आहे. ती बदलणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात किमान शिक्षित महिलांना रोजगाराची संधी निर्माण करणे आवश्यक आहे. त्या करता भांडवल गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले गेले तर पर्यावरण स्नेही रोजगार निर्माण होऊ शकतात. उदा. मेंढा लेखा येथील महिलांनी रस्ता निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन खाण तयार केली व दगड फोडण्याचे काम केले व पर्यावरणास धक्काही न लावता स्वात:ला रोजगार मिळवलाच पण यातूनच ट्रक विकत घेतला जो आता गावातील उत्पादक कामास उपयोगी पडत आहे. शहरात टॅक्सी व रिक्षा चालवणे हे काम ही उत्पादक काम आहे अश्या संधी वाढवणारी भांडवल गुंतवणूक करण्याची गरज आहे. स्त्री पुरुष विषमतेचा प्रश्न एकूण समाजाच्या मोठ्या विकासाच्या अवकाशात मांडण्याची व सोडवण्याची गरज आहे. महिला लोकप्रतिनिधीचा अनुभव हा खूप उत्साहवर्धक आहे. म्हणून  विधान सभा व लोकसभेतही महिलांचे ३३ % आरक्षण मिळणे गरजेचे आहे. या करता लोकशिक्षण होणे गरजेचे आहे. चर्चेत मंगेश खातू, एड.जयेश श्रॉफ, सुनीता कुलकर्णी, अविनाश कदम यांनी काही प्रश्न विचारले व आपले अनुभवही मांडले. शेवटी करंदीकर यांनी १२ -१३ जानेवारी २०१९ रोजी पुणे येथे होणाऱ्या विचारवेध संमेलनात सहभागी व्हा असे आव्हान त्यांनी केले.या चर्चेचे संचलन अनिल शाळीग्राम यांनी केले.प्रास्ताविक संजीव साने यांनी केले

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई