शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

हा तर ठाकरे गटातील गँगवॉर; एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र- उदय सामंत

By अजित मांडके | Updated: February 9, 2024 14:31 IST

उदय सामंत यांची टिका

ठाणे : मॉरिस याच्या अनेक बॅनर मध्ये उबाठा गटाचे पक्षप्रमुख आणि उबाठाचे युवनेता यांच्या मार्गर्शनाखाली मला काम करायचे आहे असे त्याने म्हंटले होते. गुरुवारी झालेले गँगवार हे उबाठा गटाचे आहे. नगरसेवक मी होणार की तू होणार, एकमेकातील स्पधेर्मुळे हा प्रकार झालेला असल्याची टिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. परंतु असा प्रकार घडणे हे दु्दैवी आहे. एखाद्या पक्षातील नेत्याच्या घरी असा प्रकार घडू नये ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु विनाकारण मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र केले जात असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसर येथे मॉरिस नरोन्हा याने फेसबुक लाइव्ह करत गोळीबार केला होता. या गोळीबारात अभिषेक यांचा मृत्यू झाला. तर मॉरिस याने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मॉरिस याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले जात आहेत. याविषयी खुलासा करण्यासाठी उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. दहिसर येथील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाºया मॉरिस याचे उदात्तीकरण सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून  करण्यात आल्याचा आरोप करत  त्यांनी त्याचे वृत्त देखील माध्यमांसमोर प्रसिद्ध केले. असा प्रकार घडणे हे दु्दैवी आहे. एखाद्या पक्षातील नेत्याच्या घरी असा प्रकार घडू नये ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे घोसाळकर कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. परंतु काहीजण राजकारण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करत आहेत. ही प्रवृत्ती वाढत आहे. या प्रकारचा आम्ही निषेध करतो. मॉरिस याला मोठे करण्याचे काम सामना मधून, तर घोसाळकर यांच्या सामाजिक कायार्ला मातोश्री मधून असल्याचे स्पष्ट होत आहे. एखादी वाईट घटना घडली तर ती शिंदे यांच्यामुळे घडली आणि एखादी चांगली घटना घडली तर ती आम्ही यापूर्वी केली अशा प्रकारची भूमिका काही लोक राजकारणात मांडत आहेत असा आरोपही त्यांनी केला. मॉरिस हा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले. त्यापेक्षा घोसाळकर हे हा प्रकार घडण्यापूर्वी कोणाला भेटले. याचा देखील तपास व्हायला हवा. फेसबुक लाइव्ह मध्ये तडजोड झाली त्यामागे कोण होते. हे जनतेसमोर आले पाहिजे असेही सामंत म्हणाले

टॅग्स :Abhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकरUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे