शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणीत ठामपाची ५७ व्या स्थानी घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 02:52 IST

केंद्राच्या सर्व्हेत पिछेहाट : प्रशासनासह शिवसेना-भाजपा तोंडघशी

ठाणे : स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या ठाणे महापालिकेचे प्रकल्प हे केवळ कागदावरच असल्याने प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये ठाणे महापालिका थेट ५७ व्या स्थानावर फेकली गेली आहे. यामुळे पालिकेचे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती चांगलीच तोंडघशी पडली आहे

स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे महापालिकेने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली असली, तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत मात्र महापालिका सपशेल नापास झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. परंतु, तीन हजार ७०० कोटींच्या क्लस्टर योजनेचा समावेश स्मार्ट सिटीच्या योजनेत केल्याने पालिकेचा क्रमांक घसरल्याचा अजब युक्तिवाद पालिकेच्या घोषणाबाज प्रशासनाने केला आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अंमलबजावणीबाबत यापूर्वीसुद्धा ठाणे महापालिकेचे राज्य शासनाने कान उपटले आहेत.

अनेक योजनांची घोषणा पालिकेकडून होत असली, तरी त्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यात पालिका कमी पडत असल्याचेच या गुणांकावरून दिसून येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी स्मार्ट मिशनअंतर्गत निधी मिळणार असून हे सर्व प्रकल्प प्रगतरपथावर असल्याचा दावा मात्र प्रशासनाकडून केला आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात झालेल्या केंद्राच्या सर्व्हेमध्ये मात्र ठाणे महापालिका थेट ५७ व्या क्र मांकावर फेकली गेली. मात्र, हे सर्वेक्षण अंतिम नसून २५ किंवा २६ फेब्रुवारीला घोषित होणाºया रँकमध्ये पालिका आघाडीवर असेल, असा दावा केला आहे.मिशनअंतर्गत ४२ प्रकल्पांची आखणीस्मार्ट सिटीअंतर्गत ४२ प्रकल्पांची आखणी केली असून त्यातील ४१ प्रकल्पांच्या डीपीआरला मान्यता मिळाली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तर, ३८ प्रकल्पांची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली असून या प्रकल्पांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेमध्ये क्लस्टर योजनेचा समावेश केल्याने आणि सर्वाधिक म्हणजे तीन हजार ७०० कोटींचा निधी यासाठी प्रस्तावित असल्याने अंमलबजावणीच्या बाबतीत ७५ टक्के परिणाम क्लस्टर योजनेचा असल्याने हा रँक घसरला आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका