शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या टप्प्याची निविदा काढा, आयुक्तांची एमएमआरडीएकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:49 IST

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी केडीएमसीने रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी केडीएमसीने रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यातील चार, पाच, सहा आणि सात या टप्प्यांतील कामे सुरू झाली आहेत. प्रकल्पाच्या तिसºया टप्प्यासाठी महापालिकेने ७० टक्के भूसंपादन पूर्ण केले आहे. त्यामुळे मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडीदरम्यानच्या कामाची निविदा एमएमआरडीएने काढावी, अशी मागणी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी एमएमआरडीएकडे केली आहे.३० किलोमीटरचा रिंगरोड ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १०२ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. या प्रकल्पाचे काम सात टप्प्यांत होणार आहे. त्यापैकी चार, पाच, सहा आणि सात या टप्प्यांची कामे सुरू झाली आहेत. प्रकल्पासाठी संपादित कराव्या लागणाºया एकूण भूसंपादनापैकी ५१ टक्के जमीन केडीएमसीने ताब्यात घेतली आहे. २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाल्याने या रस्त्याची व्याप्ती २१ वरून ३० किमीपर्यंत वाढली. रिंगरोड प्रकल्प हेदुटणे, माणगाव, सागाव, भोपर, घारीवली, आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली, गावदेवी, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण, वाडेघर, उंबर्डे, कोलिवली, गांधारे, बारावे, वडवली, आटाळी, आंबिवली, बल्याणी, उंभार्ली, मांडा, टिटवाळा असा आहे.प्रकल्पाच्या तिसरा टप्पा हा मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडी असा आहे. या टप्प्यासाठी आवश्यक असणारी ७० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे तिसºया टप्प्याची निविदा एमएमआरडीएने काढावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे. दुसरा आणि पहिला टप्पा हा २७ गावांशी संबंधित आहे. २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. परंतु, २७ गावांपैकी १० गावे ही ग्रोथ सेंटरशी संबंधित असल्याने या गावांसाठी नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. त्याठिकाणचा निर्णय एमएमआरडीएला घ्यावा लागणार आहे, असे बोडके यांनी सांगितले.प्रशासकीय अडथळेप्रकल्पासाठी काही जमीन संपादित करण्यात काही अडथळे येत आहेत. प्रकल्पबाधित जमीन ज्याच्या नावावर आहे, त्याच्या कुटुंबातील वारसांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बाधित जागेवर दावेदार जास्त आहेत. तसेच जागा एकाची आणि त्यावर कब्जा दुसºयाचा आहे. त्यामुळे कब्जेदारही दावेदार होऊन पुढे येत आहेत. या समस्येमुळे प्रकल्पबाधितांचा मोबदला कोणाला द्यायचा, हे ठरत नाही. तसेच प्रकल्पबाधितांना टीडीआरस्वरूपात मोबदला दिला जाणार आहे.प्रकल्पबाधित न्यायालयातरिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्यात आंबिवली, अटाळी परिसरांतील जवळपास ८४२ प्रकल्पबाधित आहेत. परंतु, त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याचिकेवर काय निर्णय होतो, याकडे महापालिका व प्रकल्पबाधितांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी