शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर स्वच्छ, सुंदर दिसण्यासाठी स्वच्छता मार्शल, दंडात्मक कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 18:05 IST

मात्र काही वर्षांपासून शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाई अभियान यशस्वीपणे राबविले जात असल्याने, शहराचा बकालपणा काही प्रमाणात कमी झाला आहे.

उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी स्वच्छता मार्शल नियुक्त करण्याचा ठराव २० ऑगस्टच्या महासभेत येणार आहे. रस्त्यावर कचरा टाकने, थुंकणे, उघड्यावर लघुशंका, शौचास बसणे आदीवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्वच्छता मार्शल नेमण्यात येणार असून दंडात्मक कारवाईचे दरपत्रक महासभेत प्रस्तावित केले आहे.

उल्हासनगरातील स्वच्छतेबाबत नेहमी टीका टिपण्णी होत असते. मात्र काही वर्षांपासून शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाई अभियान यशस्वीपणे राबविले जात असल्याने, शहराचा बकालपणा काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र शासनाच्या स्वच्छता अभियानात महापालिकेत स्वच्छतेचा दर्जा समाधानकारक नाही, असे महासभेत आणलेल्या प्रस्तावात नमूद केले. यातूनच शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी स्वच्छता मार्शल नेमण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्यात आला. मात्र कोरोना महामारीत सादर प्रस्ताव महासभेत आणण्याला उशीर झाल्याचे बोलले जाते. सुरुवातीला २० स्वच्छता मार्शल नेमण्याचा घाट असून त्यामध्ये वाढ करण्याचे संकेत देण्यात आले. स्वच्छता मार्शल महापालिका आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी यांच्या अधिकाराखाली काम करून दंडात्मक कारवाई करणार आहेत.

 शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रस्तावात दंडात्मक कारवाईचे दर प्रस्तावित केले आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यास १५० रुपये, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे याला १०० रुपये, उघड्यावर शौचास बसणे ५०० रुपये, प्लास्टिक व थर्मोकोल ठेवणाऱ्यावर पहिली वेळ ५ हजार दुसरी वेळ १० हजार तर तिसऱ्या वेळी २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यावर प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी ५००, रस्त्यावर गाड्या धुणे एक हजार, इमारतीचा मलनिस्सारण पाईपला गळती साठी १० हजार, दुकानदार व फेरीवाले यांनी कचऱ्याचा डबा न ठेवल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाईचे दर प्रस्तावित केले. याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वच्छता मार्शलमुळे नागरिकांना शिस्त लागेल

कोरोना महामारी नागरिकांना स्वच्छता शिकवून जात आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेला स्वच्छता मार्शल नेमावे लागणे दुर्दैवी असून, शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महासभेत आलेला प्रस्ताव एकमताने मंजूर करावा. यासाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर