शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीसह २७ गावांत होणार ११० कोटींचे १२ रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:14 IST

कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत.

कल्याण : कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहर व ग्रोथ सेंटरच्या परिसरात सुसज्ज व चकाचक रस्ते होणार आहेत.कल्याण-डोंबिवली पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासकामांसाठी फारसा निधी मिळत नाही. २७ गावांतील रस्त्यांचा विकास एमएमआरडीएद्वारे करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिली होती. त्यानुसार, एमएमआरडीएने रस्ते विकासासाठी ११० कोटींची कामे मंजूर केली आहेत. यापूर्वी २७ गावांतील कल्याण ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. कल्याण ग्रोथ सेंटरसाठी १० गावे निवडली आहेत. मात्र, तेथील जमीनमालकांचा ग्रोथ सेंटरला जागा देण्यास विरोध आहे. त्यावर तोडगा निघू शकलेला नाही.ग्रोथ सेंटरसाठी रस्ते व अन्य पायाभूत सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे. या हेतूने मंजूर केलेल्या १२ रस्त्यांपैकी शीळ रस्ता ते नारिवली, पाइपलाइन रस्ता ते कोळे, घेसर, आशेळे ते शक्तिपीठ, भालगाव ते वसार बसस्टॉप, मयूर हॉटेल ते तुकाराम चौक दावडी, पाइपलाइन रस्ता ते हेदुटणे, शिरढोण हे सहा रस्ते २७ गावांतील आहेत. त्यापैकी घेसर, कोळे, दावडी, हेदुटणेचा परिसर ग्रोथ सेंटरशी निगडित आहेत. याशिवाय मोहने रस्ता, इंदिरानगर आदिवासीपाडा ते नांदप, आधारवाडी रस्ता, पांडुरंगवाडी ते गावदेवी, छत्री बंगला ते मंगेशीधाम, सेंट झेविअर स्कूल ते चंद्रभागा टॉवर हे सहा रस्ते काँक्रिटचे होणार असून, त्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.>१४ गावांनाही होणार फायदा२७ गावांतील ६२ कोटी रुपये खर्चाचे रस्ते मंजूर करण्यासाठी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातून नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांतील रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्यात गोरपे ते काकोळे, कोळे ते उत्तरशीव, पाली ते शिरवली, करवले ते उत्तरशीव, करवले ते नेवाळी या रस्त्यांचा समावेश आहे. ही कामे मंजूर करण्यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. कल्याण-डोंबिवलीतील सगळ्यात महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जात आहे. हा प्रकल्प ८०० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात १०३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून कल्याण पूर्व व पश्चिमेतील तीन रस्ते काँक्रिटचे करण्यात आले. हे काम महापालिकेने केले होते. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आणखीन ३०० कोटींचा निधी प्राप्त झाल्यावर २४ रस्ते विकसित केले होते. या निधीतून ५० कोटी रुपये वाचले होते. ते परत न पाठवता त्यातूनही अंतर्गत रस्ते तयार करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.