शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ५८ बेकायदा बांधकामे जैसे थे, आदेश होऊनही वर्षभरात कारवाई होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 17:42 IST

केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.

डोंबिवली -  केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी आयुक्त पी वेलरासू यांची भेट घेतली. यात संबंधित बांधकामांवर कारवाईचे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले असलेतरी या प्रभागासाठी सक्षम अधिकारी महापालिकेला सापडत नसल्याचे चर्चेतून समोर आले आहे.  केडीएमसीतील अ, आय, ई आणि ह प्रभागांमध्ये मोठया प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत. नवीन उभी राहणारी बांधकामे देखील प्रशासनाकडून थोपविली जात नसल्याने या बांधकामांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. ई प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांना बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रभागाचा पदभार जे 4 प्रभागाचे प्रभारी प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्याकडे अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला आहे. ई प्रभागामध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असताना एकाच अधिका-याकडे दोन प्रभागांचा पदभार देऊन आयुक्तांनी काय साधले? असाही सवाल उपस्थित होत आहे. बेकायदा बांधकामांचे माहेरघर म्हणून ई प्रभागाकडे पाहिले जाते. महापालिकेतील काही वरीष्ठ अधिका-यांची या उभ्या राहणा-या  बांधकामांमध्ये अप्रत्यक्षरित्या भागिदारी असल्याने कारवाईसाठी गेलेल्या प्रभाग अधिका-यांवर दबाव येत असल्याची सुत्रंची माहीती आहे. कारवाईसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नाही अशीही ओरड प्रशासनाकडून सुरू असते परंतू आमच्याकडून वेळोवेळी बंदोबस्त पुरविला गेला आहे असे पोलिस विभागाचे म्हणणो आहे. दरम्यान याठिकाणचा पदभार सांभाळणा-या अधिका-यांवर नेहमीच कारवाईची टांगती तलवार असते त्यामुळे प्रभाकर पवार यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर कोणीही सक्षम अधिकारी या प्रभागाचा कारभार हाताळण्यासाठी पुढे येत नसल्याचे बोलले जाते. बुधवारी आयुक्तांबरोबर राष्ट्रवादी पदाधिका-यांनी केलेल्या चर्चेत सक्षम अधिकारी मिळत नसल्याने याठिकाणी सद्यस्थितीला अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे समोर आले. नांदीवली आणि आसपासच्या परिसरात वर्षभरात ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश देण्यात आले होते परंतू त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याकडे संबंधित पदाधिका-यांकडून लक्ष वेधण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस समीर भोईर, डोंबिवली कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, सरचिटणीस जगदीश ठाकूर, उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर आदिंनी आयुक्तांशी चर्चा केली. यात अशा बांधकामांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून नव्याने बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घेऊ असे आयुक्तांकडून सांगण्यात आले अशी माहीती नांदोस्कर यांनी दिली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली