शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चक्क नातेवाईकच निघाला चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 04:03 IST

हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत (२८, रा. किंजल, दिघा, नवी मुंबई)

ठाणे : हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत (२८, रा. किंजल, दिघा, नवी मुंबई) याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोकडसहित ५८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.कळव्याच्या न्यू शिवाजीनगर येथील विनायक चाळीत राहणारे रूपसिंग राठोड (३६) यांच्या घरात २५ आॅक्टोबरला सकाळी ७.३० ते २६ आॅक्टोबरला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली. यामध्ये ६८ हजारांची रोकड, अर्धा तोळा सोन्याचे मंगळसूत्र, तसेच काही दागिने असा ८२ हजारांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी राठोड यांनी २७ आॅक्टोबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासमवेत काही नातेवाईकही होते. त्यात त्यांच्या बहिणीचे पती कमलेंदर (मेहुणे) यांचाही समावेश होता. या चोरीचा तपास लवकर लावावा, असा आग्रहदेखील त्यांनी पोलिसांकडे धरला होता.पोलिसांनी राठोड यांच्या घराची पाहणी केली. तेव्हा या घराची चावी कोणाकडे असते, आणखी कोणकोण नातेवाईक तिथे आले? या सर्व बाबींची चौकशी त्यांनी केली. तेव्हा संशयाची सुई कमलेंदर यांच्याकडेच आली. तरीही, आपण त्या गावचे नसल्याचा आव आणणाºया या मेहुण्याची पोलिसांनी कसून चौकशी केली.याच चौकशीत त्याने याचोरीची अखेर कबुली दिली. हार्डवेअरच्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात उधारी झाली होती. ही उधारी चुकविण्यासाठी देणेदारांनी तगादा लावला होता. मग जितक्या पैशांची गरज होती, तेवढीच रोकड आणि दागिन्यांची चोरी केली, असा दावाही त्याने पोलिसांकडे केला.

टॅग्स :ThiefचोरCrimeगुन्हा