उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये होती शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 01:01 AM2020-09-24T01:01:33+5:302020-09-24T01:01:51+5:30

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते.

There was peace in the markets of Ulhasnagar | उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये होती शांतता

उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये होती शांतता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात संततधार पाऊस सुरू असून कुठेही पाणी तुंबल्याची घटना घडली नाही. संततधार पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शांतता असून नागरिक फिरकले नसल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.


उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते. मात्र, मंगळवार रात्रीपासून संततधार सुरू असल्याने ग्राहक मार्केटमध्ये फिरकलेच नाही. आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोर, कॅम्प नं-३ स्टेट बँक, मयूर हॉटेल, गुलशननगर आदी ठिकाणी काही काळ पाणी तुंबले होते.


मात्र, पावसाचा जोर नसल्याने पाण्याचा निचरा झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. तसेच उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली नसल्याचे ते म्हणाले.

पावसामुळे चाकरमान्यांची दांडी
च्अंबरनाथ / बदलापूर : मंगळवार रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे दांडी मारण्याची वेळ आली. त्यातच बससेवेवरही पावसाचा विपरित परिणाम झाल्याने कामगारांना बसनेही कामावर जाणे शक्य झाले नाही.
च्अंबरनाथ आणि बदलापूरमधील चाकरमानी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले. मात्र, लोकलसेवा विस्कळीत असल्याचे कळताच घरचा रस्ता धरला.
च्दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक नागरिकांनी घरी बसणे पसंत केले, तर बाजारपेठेतही तुरळक गर्दी दिसत होती.

पावसाने नागरिकांची तारांबळ
च्मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मंगळवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाने नागरिकांची तारांबळ उडवलीच, पण घरात पाणी शिरल्याने त्यांचे अतिशय हाल झाले.
च्मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेकांना भिजतच आपले घर गाठावे लागले. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. मुर्धा-मोरवा गावातही अनेकांच्या घरांत पाणी शिरले. पालिकेचे कोणी मदतीसाठी फिरकले नाही की, पाणी तुंबले तेथील कचरा काढण्यासाठीही कोणी आले नाही, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
च्घरात पाणी शिरल्याने खालच्या भागात ठेवलेले साहित्य उचलण्याची घाई उडाली. सामान भिजल्यानेही नुकसान झाले. नागरिकांच्या जेवणाचेही हाल झाले. अनेक ठिकाणी तर बुधवार सकाळपर्यंत पाणी उतरले नव्हते. पावसाने महापालिका आणि नगरसेवक काय कामे करतात, हे पुन्हा चव्हाट्यावर आल्याचा संताप नागरिकांनी बोलून दाखवला.

Web Title: There was peace in the markets of Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.