ठाणे : आपल्या रेशनकार्डास आधार क्रमांक जोडला आहे किंवा नाही, हे वेळीच पाहून घ्या. अन्यथा, आधारकार्ड व मोबाइल क्र मांक सादर न केल्यास शिधापत्रिकाधारकांना अनुदानित रॉकेल मिळणार नसल्याचे येथील शिधावाटप कार्यालयाच्या उपनियंत्रक संगीता टकले यांनी सांगितले.नोंदणी न करणाऱ्यांचे रेशनकार्ड रद्द होणार आहे. आधार क्रमांकाची माहिती न मिळाल्यास १ फेब्रुवारी २०१७ नंतर मात्र रॉकेल मिळणार नाही. जोपर्यंत आधारची माहिती मिळत नाही, तोपर्यंत शिधापत्रिकाधारकांना रॉकेलचा लाभ घेता येणार नाही. एलपीजीच्या नव्या ग्राहकांनीदेखील आपली माहिती शिधावाटप कार्यालयास त्वरित देणे आवश्यक आहे. तसेच जे लाभार्थी रेशनवरील अन्नधान्य स्वेच्छेने नाकारतील, त्यांनीही तसे कळवायचे आहे. ३१ जानेवारीनंतर तो दिला जाणार नसल्याचेही टकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘आधार’शिवाय रेशनवर रॉकेल नाही
By admin | Updated: December 23, 2016 03:14 IST