शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीमध्ये आणखी वाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 02:49 IST

पाऊस थोडासा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने पाणीकपात आणखी वाढणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ठाणे महापालिकेने पाणीकपात ३० तासांचीच असेल व त्यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा लाभला आहे.

ठाणे : पाऊस थोडासा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने पाणीकपात आणखी वाढणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ठाणे महापालिकेने पाणीकपात ३० तासांचीच असेल व त्यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा लाभला आहे. कमी पडलेल्या पावसामुळे ठाणे पालिका हद्दीत नागरिकांना मोठ्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. परंतु यंदा योग्य नियोजनामुळे पाणीकपातीचा सामना तूर्तास तरी करावा लागणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.मागील वर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झाला. काही महापालिकांनी जादा पाणीउपसा केल्याने तो वेगाने खाली आला. जुलै महिन्यापर्यंत तो पुरावा यादृष्टीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. परिणामी, इतर वापरासाठी विहिरी, कूपनलिका यांचे पाणी वापरण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला बुधवार आणि शुक्र वार असे दोन दिवस ३० तासांची पाणीकपात करण्यात येते. यामध्ये बुधवारी टेमघर येथून होणारा पाणीपुरवठा बंद असतो. तर, शुक्र वारी स्टेम, एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद असतो. दरम्यान, सध्याची धरणाची पातळी पाहता उन्हाळ््यात बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यातच, हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा विचार करता पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.