शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:26 IST

‘पोश्री’वरही प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध

विजय मांडे लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ठाणे जिल्ह्यातील महानगरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवर मोठे धरण बांधण्याचे कोकण पाटबंधारे महामंडळाने जाहीर केले आहे. मात्र, पोशीर नावाची नदी येथे नसताना तिचा उल्लेख आला कसा, असा  प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. पोशीर नदी अस्तित्वात नाही,  मात्र या भागात असलेल्या पोश्री नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न झाला तरी आम्हाला धरण नको, असा पवित्रा बोरगाव आणि चई येथील शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला आहे.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून कर्जत तालुक्यात धरण बांधण्याचा प्रस्ताव २०-२२ वर्षांपूर्वीचा आहे. आता मात्र महामंडळाने अधिसूचना जारी केली आहे. कर्जत तालुक्यात धरण बांधले जाणार असून, तीन गावे विस्थापित होणार आहेत. कर्जत तालुक्यात पोशीर नदी आहे कुठे?, असा प्रश्न लोकांना पडला आहे.  चिल्लार, पोश्री आणि पेज अशा तीन नद्या कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे कोणत्या नदीवर धरण बांधणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या भागात धरण बांधले जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांची संमती आहे का? याबाबत कोणत्याही प्रकारची सुनावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शासन स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहमतीशिवाय पोशीर धरण बांधण्याचे धोरण कितपत योग्य आहे, असा प्रश्न बोरगावचे ग्रामस्थ सतीश पाटील यांनी केला आहे.

पोश्री नदीवर धरण बांधणार असेल तर ती भीमाशंकर अभयारण्यातील डाेंगरात उगम पावते. बेलाचीवाडी, नांदगाव अशी ही पोश्री नदी चई गावासमोरून धाबे वाडी येथून बोरगावच्या शिवारातून कळंबहून पोशीर गावाच्या बाजूने चिकनपाडा, मानिवली, खाड्याचा पाडा, अशी उल्हास नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यात ती कोरडी असते. बोरगाव, चई आणि चेवणे या गावांना विस्थापित करून धरण बांधले जाणार आहे. 

धरण कोणत्या नदीवर बांधणार, ते आधी सांगा?आधी धरण पोशीर नदीवर बांधले जाणार आहे? हे शासनाने जाहीर करावे. तसेच पोशीर नदी कुठून, कुठे वाहते? हे शासनाने जाहीर करावे. शासनाच्या कागदावर असलेल्या पोशीर नदीवर शासनाने जरूर धरण बांधावे, अशी चर्चा आहे.

टॅग्स :thaneठाणेKarjatकर्जतriverनदी