शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अजून बऱ्याच विकेट काढायच्या आहेत; एकनाथ शिंदे यांच्या विधानाने तर्कवितर्कांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 06:28 IST

गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे यांनी आपल्या आमदारांसह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरुपौर्णिमा साजरी केली.

ठाणे : मी मुख्यमंत्री असलो तरी तुमच्यातील एक आहे, त्यामुळे रस्त्यावर उतरून जनतेची कामे करीत आहे. मात्र, घरात बसून जनतेची कामे होत नाहीत, कोविड काळात तर आपले परके झाले होते, भेट देण्यासही तयार नव्हते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. आता बऱ्याच जणांच्या विकेट अजून काढायच्या आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोख जुन्या विरोधकांकडे की नव्या स्पर्धकांकडे अशी चर्चा सुरू झाली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे यांनी आपल्या आमदारांसह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच यावेळी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी ते बोलत होते. २०१९ मध्ये युतीचेच सरकार येणार होते. मात्र, काहींना सत्तेचा आणि खुर्चीचा मोह आवरला नाही, त्यामुळे ते सरकार येऊ शकले नाही. घरात किंवा कार्यालयात बसून जनतेची कामे होत नाहीत. आता खऱ्या अर्थाने युतीचे सरकार आले असून लोकहिताची कामे केली जात आहेत. आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायचे आहे. कलाकारांनी कलाकारांसाठी कामे केले पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नका, अशी सूचना त्यांनी केली.

आठ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार, १३ जागा भरणार

राज्याच्या मंत्रिमंडळात अजून १३ जागा भरायच्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राष्ट्रवादी मंत्र्यांच्या शपथविधीमुळे शिवसेना आमदारांमध्ये नाराजी नसल्याचा दावा देसाई यांनी केला.  शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आठ दिवसांत विस्तार होईल, असे आनंदाश्रम येथे पत्रकारांना सांगितले. येत्या ९ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यात शिंदे गटाला पाच तर भाजपला आठ मंत्रिपदे प्राप्त होतील, असे समजते.  अजित पवार यांच्या रूपाने लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, हा पोपट गेले वर्षभर चुकीची चिठ्ठी काढतो. या पोपटाची एकही चिठ्ठी खरी निघाली नाही. या पोपटाचे तुम्ही ऐकू नका.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार