शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी असती- मंगलप्रभात लाेढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 06:25 IST

मोदी@९ अंतर्गत भाजपतर्फे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात तसेच लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते  बोलत होते.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यामुळेच भारताची आर्थिक स्थिती मजबूत झाली, अन्यथा भारताची स्थिती श्रीलंका, बांगलादेशप्रमाणे झाली असती, असे मत राज्याचे कौशल्य विकास व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी येथे व्यक्त केले. 

मोदी@९ अंतर्गत भाजपतर्फे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात तसेच लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते  बोलत होते. पंतप्रधान मोदी  सरकारने सुरू केलेल्या योजनांत आतापर्यंत २० कोटी नागरिक लाभार्थी झाले आहेत. त्यांच्या  जीवनात बदल घडविण्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींनाच असल्याचे प्रतिपादन लोढा यांनी केले.

पंतप्रधान मोदी हे राष्ट्रप्रेम व अध्यात्म प्रेमाने भारलेले व्यक्तिमत्त्व आहे. जगातील अव्वल पाच राष्ट्रांत भारताची अर्थव्यवस्था पोहाेचवली. मजबूत अर्थव्यवस्थेमुळेच भारताची आर्थिक स्थिती श्रीलंका व बांगलादेशप्रमाणे झाली नाही, असे मत लोढा यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नऊ वर्षांतील कार्य घराघरांत पोहाेचविण्याचे आवाहनही लोढा यांनी केले. देश कार्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाणे खणखणीत आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला हक्क मिळवून देण्याचे कार्य मोदींकडून करण्यात आले. 

२२० कोटी डोस मोफत दिलेकोरोनावरील २२० कोटी डोस मोफत देण्याची कामगिरी केवळ भारतातच घडते, असे आमदार डावखरे म्हणाले.  पुन्हा मोदींचेच सरकार येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करण्याचे आवाहन माजी खा. संजीव नाईक यांनी केले. यावेळी  जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे,  निवडणूकप्रमुख मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, अर्चना मणेरा, स्नेहा आंब्रे, जिल्हा सरचिटणीस विलास साठे, भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा