शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन; शहाजीबापू पाटलांचे ठाण्यात वक्तव्य

By जितेंद्र कालेकर | Updated: February 4, 2024 21:27 IST

गणपत आणि महेश गायकवाड यांची व्यक्तीगत मालमत्तेवरुन भांडणे; मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपये घेतल्याचा आरोप निराधार: शहाजीबापू पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख यांच्यातील वाद हा वैयक्तिक मालमत्तेवरुन झाला आहे. यातून शिवसेना भाजप असे पक्षीय युद्ध लागणार नाही. पक्षीय धोरणाचेही भांडण होणार नाही.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपये घेतल्याचा आमदार गायकवाड यांनी केलेला आरोप निराधार असल्याची स्पष्टोक्ती सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी रविवारी ठाण्यात केली.

ठाण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपीटर रुग्णालयात लहान मुलांच्या ह्दयाला असलेल्या छिद्रावरील शस्त्रक्रिया शिबिराला त्यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले, विकासनगरी आहे, त्या भागात असे प्रश्न उद्भवले आहेत. वैयक्तिक कारणातून कोणीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप करु नये. स्वत:च्या र्स्वाासाठी दुसऱ्यावर खापरही फोडू नये, असा टोलाही त्यांनी भाजपच्या गणपत गायकवाड यांना लगावला आहे. या प्रकरणाला पक्षीय रंग नको, असेही ते म्हणाले. खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सुरुवातीपासूनच विविध प्रकारचे आरोप करीत असून ते मुख्यमंत्री झाल्याचेच त्यांना रुचलेले नसल्याचेही एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी स्पष्ट केले.

महेश यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तर पाटील यांची प्रकृती िस्थर आहे. हा गोळीबाराचा प्रकार खेदजनक असून महेश हे बोलण्याच्या िस्थतीत नाहीत. ते बोलण्याचा प्रयत्न करीत होते. परंतू, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना बोलता आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन...खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने देव दूत आपल्यासोबत आहेत. कोणी काय आरोप करतो, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून रुग्णांना खूप मदत झाली. आपल्या सांगोला मतदारसंघातील रुग्णांना दोन कोटींची मदत म्हणून त्यांनी दिले.उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एका तरी रुगाणाला एक लाख रुपये मदत केली आहे का? केली असेल तर मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन. हे एक दौरा करतात आणि मग तीन महिने मातोश्रीवर दारे बंद करुन बसतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.गाजावाजा न करता १५० शस्त्रक्रिया-लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रावरील शस्त्रक्रिया डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात शिबिर झाले. यात ६०० मुलांच्या शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प आहे. त्यातील १५० शस्त्रक्रिया रविवारी ठाण्यात झाल्याची माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. रुग्णांसाठी काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याप्रमाणे श्रीकांत शिंदे यांनी हे काम केल्याचेही ते म्हणाले. ज्युपीटर रुग्णालयात आयाेजित िशिबराला भेट दिल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त कले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे