शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या घरी त्यांचे भोजन शेवटचे ठरले... , शहा कुटुंबीयांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:32 IST

डोंबिवलीमधील भाविक देवदर्शनासाठी जीपमधून जात असताना गुजरातमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याने डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे.

मुरलीधर भवार डोंबिवली : डोंबिवलीमधील भाविक देवदर्शनासाठी जीपमधून जात असताना गुजरातमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याने डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे. ते सर्वजण कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी गुजरातमधील पलिताना येथे गेले होते. डोंबिवलीतून ते शनिवारी सकाळीच निघाले. एक्स्प्रेसने त्यांनी गुजरात गाठले. बहिणीच्या घरी रात्रीचे भोजन घेऊन थोडा वेळ आराम केला आणि पहाटे गाडीने पलिताना येथे जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. एकाच कुटुंबातील दहा जण आणि गाडीचा चालक अशा ११ जणांची प्राणज्योत मालवली. पर्युषण पर्व सांगतेला जैन धर्मीय एकाच कुटुंबातील एवढ्या जणांवर मृत्यूने घाला घातल्याचे कळताच डोंबिवलीत शोककळा पसरली.शहा कुटुंबीय मनमिळाऊ!निशिगंधा इमारतीत दुसºया मजल्यावर किरण शहा राहत. त्यांच्या शेजारीच नातेवाईकही राहत होते. सारे भाऊ परस्परांना सांभाळून होते. काळजी घेणारे होते. याच इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणारे मनोज मेहता हे शहा कुटुंबीयांचे २५ वर्षांपासूनचे शेजारी. त्यांच्या रूपाने अत्यंत मनमिळाऊ शेजारी आम्हाला लाभले. त्यांच्या कुुटुंबावर अनेक संकटे व दु:खे आली. काळाने अखेर त्यांच्यावरही घाला घातला. सर्व शेजाºयांना हसतमुखाने भेटत त्यांनी शनिवारी निरोप घेतला, तो शेवटचाच, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.अशोक संघवी यांच्या घरातच एक जैन मंदिर आहे. शेजारीपाजारी जेव्हा कुठेही बाहेरगावी व चांगल्या कामासाठी निघतात, तेव्हा तेथे नमस्कार करतात. शहा कुटुंबीयांनीही संघवी यांच्या घरातील मंदिरात माथा टेकवून प्रार्थना केली. नंतर ते प्रवासाला गेले, पण पुन्हा आलेच नाहीत... असे सांगताना संघवी व मेहता कुटुंबीय हेलावून गेले.शशिकांत शहा हे टेलरिंगला लागणारे साहित्य पुरवत. वर्षभरापूर्वी त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची मुलगी धरा काम करून कुटुंबाला हातभार लावत होती. तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. शशिकांत, पत्नी रिटा, मुलगी धरा यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला; तर मुलगा जैनम बचावला. तो डोंबिवलीतील गुरुकूल कॉलेजमध्ये १२ वीत होता.शहा कुटुंंबातील १० जणांचा मृत्यू झाल्याचे कळताच रविवारी पर्युषणानिमित्तच्या कार्यक्रमांवर दु:खाची छाया पडली. यानिमित्त डोंबिवलीच्या विविध मंदिरांत भोजन व मिष्ठान्न दिले जाते. तेथे केवळ डाळ-भात देण्याचा निर्णय घेण्यात आला. मिष्ठान्न वाटपाचा कार्यक्रम रद्द करून ते गरिबांना वाटण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतला.अख्खे कुटुंब काळाच्या पडद्याआडकमलेश हे व्यापारी होते. त्यांचा सात वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.त्यांची पत्नी किरण ही गृहिणी असली, तरी कमलेश यांच्या मृत्युपश्चात मुलांचा सांभाळ करीत होती.मुलगी जिनाली ही ठाकुर्लीच्या कॉलेजमध्ये टीवाय बीकॉमला शिक्षण घेत होती; तर नेमिल हा अंधेरीच्या जैन महाविद्यालयात १२ वी सायन्सला शिकत होता. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे अख्खे कुटुंबच काळानेओढून नेले.

टॅग्स :Accidentअपघात