शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

त्यांचे लक्ष केवळ स्वत:ची तिजोरी भरण्याकडेच; विजय वडेट्टीवारांचा आरोप, कळवा रुग्णालयाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 06:33 IST

ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले ४० आणि आता जे गेले आहेत ते ४० आमदार हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र, ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

कळवा रुग्णालयात झालेल्या १८ मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने घराणेशाहीविरुद्ध घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना छेडले असता, जेव्हा सगळे पर्याय संपतात त्यावेळेस भाजपला गांधी परिवार दिसतो. गांधी परिवाराकडे बोट दाखवले जाते, दहा वर्षांत उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादीसारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती, असा आरोप त्यांनी केला. 

तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसिहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता. मात्र, देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नसल्याचेही ते म्हणाले. दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला परिवार म्हणण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला जात असल्याचेही ते म्हणाले.

२०२४ मध्ये ते जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएमच्या भरवशावर झेंडा फडकवणार असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच आलबेल सुरू आहे. एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे, तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे, अशीच परिस्थिती राज्यातील सरकारची असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkalwaकळवाhospitalहॉस्पिटल