शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नोकराने केलेली चोरी उघड, आरोपीला मध्यप्रदेश येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:42 IST

याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

नालासोपारा (मंगेश कराळे ) :- आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमधील नोकराने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि घड्याळ चोरून नेले होते. या आरोपी नोकराला मध्यप्रदेशच्या खांडवा नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे.

बोरिवली येथील खुशल हेरिटेज टॉवरमध्ये राहणारे समाजसेवक प्रदीप गुप्ता (45) हॆ नालासोपारा पश्चिमेकडील सुखाआंगण सोसायटीतील डॉ. सर्व्हेश्वर शर्मा यांच्या वेदस आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमध्ये 25 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता पंचकर्म उपचारासाठी गेले होते. आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमधील रूममध्ये त्यांनी अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम मोबाईल आणि घड्याळ असा एकूण 17 लाख 5 हजारांचा मुद्देमाल सेंटरमधील आरोपी नोकर राकेश पांडेय (32) याने चोरून नेला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठानी नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकारी व अंमलदारांना तात्काळ गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीही फुटेज पाहुन आरोपी राकेशचा शोध सुरु केला. आरोपी हा मोबाईल मधील सीम कार्ड बदलत गावी जात असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासात सातत्य ठेवून केलेल्या अथक प्रयलानंतर आरोपीच्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषनावरून व ठिकठिकाणच्या ५० सीसीटीव्हीची पडताळणी केल्यानंतर आरोपी हा त्याचे मुळ गावी रेल्वेने पळुन जात होता. त्याला 28 फेब्रुवारीला खांडवा, मधप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले.  आरोपीची अंगझडती घेतली असता आरोपीकडे गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम मोबाईल आणि घड्याळ असा एकूण 17 लाख 5 हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहा. पो.आयुक्त विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि योगेश मोरे, पोहवा प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे, बाबा बनसोडे, सोहेल शेख यांनी केली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारी