शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेजा-याची मुलाची हौस भागविण्यासाठी केली बाळाची चोरी: ठाण्यातील ‘त्या’ महिलेची कबूली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 21:11 IST

बाळाचे अपहरण करणा-या दाम्पत्याकडून मिळालेल्या अन्य सहा मुलांची डीएनए चाचणी करण्याची अनुमती बाल कल्याण समितीने ठाणे पोलिसांना दिली आहे. लवकरच ही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देगुडीयासह तिघांनाही पोलीस कोठडीन्यायालयानेही थोपटली पोलिसांची पाठबालकल्याण समितीने दिली मुलांच्या डीएनए तपासणीची परवानगी

ठाणे: शेजा-याला मुलगा हवा होता. त्याच्याच सांगण्यावरुन ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नवजात बाळ चोरल्याची कबुली गुडिया राजभर या महिलेने ठाणे पोलिसांना दिली. तिने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण करणा-या गुडिया (३५), तिचा पती सोनू राजभर (४०) तसेच विजय श्रीवास्तव उर्फ कुबडया (५५) या तिघांनाही ठाणे न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तातडीने या प्र्रकरणाचा छडा लावल्याबद्दल न्यायालयानेही तपास पथकाची पाठ थोपटली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने डोंबिवलीच्या पिसवली गावातील आडवली, नेताजीनगर भागातून गुडियासह तिघांना सोमवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून अपहरण झालेल्या बाळासह सीता राजभर (दोन महिने), अनिता (५), सूरज (३), सुप्रिया (११), सोनी (९) आणि खुश्बू (७) या सहा मुलांना ताब्यात घेण्यात आले. ही सर्व मुले आपली स्वत:ची असल्याचा दावा राजभर दाम्पत्याने केला आहे. मात्र, मुंबईतील कालीना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून डीएनए तपासणी केल्यावरच अंतिम सत्य बाहेर येईल, असे तपास अधिका-यांनी सांगितले. मंगळवारी या सर्व मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले होते. या सर्वच मुलांची डीएनए तपासणी करण्याची परवानगी बालकल्याण समितीने ठाणे पोलिसांना दिली.शेजा-याच्या कल्पनेतून आखला चोरीचा बेत...बाळाचे अपहरण करणारी गुडिया नेताजी नगरातील दीड हजारांच्या भाड्याच्या खोलीत सहा मुले आणि पतीसह वास्तव्याला आहे. तिला पाच मुली आणि एक मुलगा आहे. आणखी एक मुलगा असावा, अशी तिची अपेक्षा होती. त्यातच विजय श्रीवास्तव उर्फ कुबडया या शेजा-यालाही मुलगा नव्हता. त्यानेही मुलाची गरज असल्याचे तिला बोलून दाखविले. या दोघांच्या कल्पनेतूनच बाळाच्या अपहरणाचा बेत शिजला आणि अपहरण केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.