शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या सायकलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:02 IST

ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल लवकरच मिळेल कोपरी पोलिसांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहन चोरीच्या घटना एरव्ही रोजच ठाण्यात दाखल होत असतात. मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्यात एका व्हीआयपीची दस्तुरखुद्द पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल संदीप वाघ यांनी दाखल केली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी पोलिसांनी केला आहे.यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात उपायुक्त काळे यांचे गार्ड वाघ यांनी ७ जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त काळे यांचे कोपरी येथील १२ बंगलामधील अक्षय या बंगला क्रमांक १६ येथे उभी केलेली हिरव्या रंगाची ३० हजारांची एका नामांकित कंपनीची सायकल ५ जुलै रोजी रात्री ९ ते ६ जुलै रोजी सकाळी १० या दरम्यान चोरीस गेली. या काळात काळे यांच्या बंगल्यावर पोलीस शिपाई (क्र. ६६३३) हे डयूटीवर होते. चोरटयाने तक्रारदार तसेच काळे यांच्या संमतीशिवाय त्यांची ही सायकल चोरुन नेली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर. जी. आंब्रे हे अधिक तपास करीत आहेत.

‘‘ होय हे खरे आहे. पण घरात काम करणाऱ्या एका नोकराच्या नातेवाईकाने ती नेली आहे. दोन दिवस वाट पाहूनही तो न आल्याने याबाबत तक्रार दाखल केली. तसा यात बातमीचा विषय नाही.’’अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा.

टॅग्स :thaneठाणेtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी