शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

२५० क्विंटल भाताची चोरी, दीड महिना होऊनही चोरांचा तपास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 04:00 IST

२५० क्विंटल भाताची चोरी : शासकीय धान्यचोर अद्याप मोकाट

मुरबाड : आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भाताची २१ डिसेंबर रोजी चोरी झाली. चोरट्यांनी ५०० गोण्या लंपास केल्याची प्राथमिक माहिती महामंडळाच्या कर्मचाºयांकडून मिळाली होती. या चोरीचा गुन्हा टोकावडे पोलीस ठाण्यात नोंदवून दीड महिना होत आला, तरीही या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

आदिवासी विकास महामंडळ, उपविभाग शहापूर यांच्या माध्यमातून शेतकºयांकडून हमी भावात भात खरेदी केला जातो. मुरबाड तालुक्यातील माळ आणि धसई येथील खरेदी केंद्रांतून ही भातखरेदी केली जात होती. महामंडळाचे स्वत:चे गोडाउन नसल्याने महामंडळाने आदिवासी सहकारी संस्था माळ आणि दूधनोली या संस्थांना ३५ रु. प्रतिक्विंटल कमिशन या दराने भातखरेदी करण्यास ठरवून दिले होते. या कमिशनमध्ये संस्थेने कर्मचाºयांची मजुरी तसेच देखभाल करावी, असे महामंडळाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

स्वत:चे गोडाउन नसल्याने त्यांनी बंद पडलेल्या पोल्ट्रीच्या इमारती भाड्याने घेऊन तेथे भातखरेदी सुरू केली होती. तर, खापरी येथे बंद पडलेल्या खाजगी शाळेची इमारत भाड्याने घेऊन तेथे भातखरेदी करून ठेवले होते. मात्र, २१ डिसेंबर रोजी खापरी येथील गोडाउनमधून २५० क्विंटलच्या ५०० गोण्या चोरट्यांनी दरवाजा तोडून लंपास केल्या. संस्थेच्या सचिवांनी याची तक्रार टोकावडे पोलीस ठाण्यात २२ डिसेंबर रोजी केली. गुन्हा दाखल होऊन एक महिना होत आला, तरी अद्याप चोरीचा तपास लागलेला नाही.खापरी येथील आदिवासी विकास खात्याच्या गोडाउनमध्ये झालेल्या भातचोरीचा तपास सुरू असून चोर लवकर पकडले जातील.- धनंजय पोरे, सहा. पोलीस निरीक्षक, टोकावडेआदिवासी विकास महामंडळाची खापरी येथील गोडाऊनमधून केलेली भात चोरी ही परिसरातीलच चोरट्यांनी केल्याचा दाट संशय आहे. - रमेश घावट, सचिव,आदिवासी सेवा सहकारी संस्था, माळ 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिस