शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या समतानगर येथील दुकानातून १५ लाखांच्या मोबाइलसह सीसीटीव्हीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:04 IST

वर्तकनगर येथील गजबजलेल्या समतानगर भागातील एका इलेक्ट्रानिक वस्तू विक्रीच्या दुमजली दुकानातून चोरटयांनी टेरेसवरुन प्रवेश करुन दुकानातील ५० मोबाईल आणि रोकडसह १५ लाखांच्या सामानांची चोरी केली. या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे ५० मोबाईलसह अनेक इलेक्ट्रीक वस्तूंची चोरीदुकानाच्या टेरेसवरुन केला शिरकाववर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : वर्तकनगरपासून जवळच असलेल्या समतानगर या गजबजलेल्या भागातील जैन ट्रेडर्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या दुकानातून सुमारे १५ लाख २७ हजारांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.दुकानाचे मालक धीरज जैन (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवदया पार्क येथे त्यांचे जैन ट्रेडर्स हे इलेक्ट्रॉनिक वस्तूविक्रीचे दोन मजली शोरूम आहे. दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर दुकानातील साहित्य ठेवण्यासाठी एक गोदाम केलेले आहे. २९ जानेवारी रोजी रात्री ९.४० ते ३० जानेवारी रोजी सकाळी १० वा.च्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या बंद टेरेसच्या आणि जिन्याच्या दरवाजाचे कुलूप तसेच दरवाजाच्या बिजागºया तोडून तळ मजल्यावरील दुकानातील एका नामांकित कंपनीचे आठ लाख ७० हजारांचे ३९ मोबाइल, अन्य एका कंपनीचे एक लाख ७० हजारांचे १२ मोबाइल असे सुमारे ५० मोबाइल तसेच एक लाखाचे वेगवेगळ्या कंपन्यांचे चार्जर, १० हजारांचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन आणि ४० हजारांची रोकड अशा १५ लाख २७ हजार १०० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रोकड चोरली आहे. जाताना दुकानातील १२ सीसीटीव्हींच्या कॅमेºयांच्या वायरचेही त्यांनी नुकसान केले. दुकान आणि परिसरात सुरक्षेसाठी १४ सीसीटीव्ही लावलेले आहेत. तरीही, नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील या दुकानातून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे........................अशी केली चोरीजैन ट्रेडर्स या दुकानात तळ मजल्यावर विक्रीसाठीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. पहिल्या माळ्यावरील सीसीटीव्ही कॅमे-यांची तोडफोड करून डीव्हीआरही लंपास केला. टेरेसकडे जाणा-या जिन्याच्या दरवाजाचे लॅच आतील बाजूने तोडून दरवाजा उघडण्यात आला होता. दुस-या माळ्यावरील टेरेसच्या दरवाजाच्या फ्रेमच्या बिजाग-या उचकटून दरवाजा तोडण्यात आला होता. त्यामुळे चोरट्यांनी दुकानाच्या वरील बाजूने येऊन टेरेसवरील दरवाजाने दुकानात शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांतील वर्तकनगर भागातील ही मोठी चोरी असल्याचे बोलले जात आहे........................दोन पथकेवर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी या चोरीच्या तपासासाठी दोन पथकांची निर्मिती केली आहे, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडूनही या चोरीचा समांतर तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी