शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतामधील तरुणाने केले बिबट्याशी दाेन हात; कसाऱ्याजवळील घटना, ग्रामस्थ भयभीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 08:48 IST

बिबट्याचा वावर असलेल्या तलावाजवळच्या खिंडीत बिबट्याने फस्त केलेल्या कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यांचे अवशेष सापडले आहेत. यावरून बिबट्याचा या खिंडीत वास्तव्य असल्याचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे.

कसारा : राड्याचापाडा येथील मंगेश माेरे हा साेमवारी संध्याकाळी शेतात काम करत हाेता. त्याच्यावर बिबट्याने मागून अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर सावध होऊन घाबरून न जाता त्याच्याबराेबर दाेन हात केले. प्रतिकार करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेन धूम ठाेकली. यात मंगेश हा जखमी झाला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वरई, नागलीचे भारे बांधण्यासाठी मंगेश हा शेतालगत वेली ताेडत हाेता. तेथेच बिबट्या लपून बसला हाेता. मंगेश बेसावध असताना या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या पाठीवर पंजा मारून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतानाच भांबावलेल्या मंगेशने स्वत:ला सावरले आणि प्रसंगावधान राखून त्याने हातातील काठीने बिबट्यावर हल्ला केला. काठीचा फटका ताेंडावर लागताच भयभीत झालेल्या बिबट्याने धूम ठाेकली. त्यानंतर मंगेशने घरी जाऊन हा प्रकार घरी सांगताच ग्रामस्थांनी त्याला उपचारांसाठी कसारा आराेग्य केंद्रात दाखल केले. त्याच्या पाठीवर जखम झाली असून उपचार करून डाॅक्टरांनी त्याला घरी साेडले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. विकासकामांच्या नावाखाली होणारी बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यजीवांचा वाड्या, वस्तीत वावर वाढला आहे. कसारा, माळ, राड्याचापाडासह समृद्धी महामार्ग जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक गावपाड्यांत बिबट्या, वानर, निलंगायी व वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे.

कुत्रे, मांजर, बकऱ्या केल्या फस्त -बिबट्याचा वावर असलेल्या तलावाजवळच्या खिंडीत बिबट्याने फस्त केलेल्या कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यांचे अवशेष सापडले आहेत. यावरून बिबट्याचा या खिंडीत वास्तव्य असल्याचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे.

वनविभागाकडून पाहणीवनविभागाचे अधिकारी चेतना शिंदे, वनकर्मचारी भोईर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच जखमी मंगेश मोरे याची विचारपूस करून त्याला मदतीचे आश्वासन दिले. दरम्यान, वनविभागातर्फे पिंजरे लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :leopardबिबट्याthaneठाणेforest departmentवनविभाग