शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर: न्यायालयाकडून कानउघाडणी; SITने आता दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 07:31 IST

बदलापूर प्रकरण : आधी दाखल हाेता एकच गुन्हा.

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. या आधी शोषण झालेल्या दोन्ही मुलींकरिता एकच गुन्हा नोंदवला होता. मात्र, न्यायालयाने कानउघाडणी केल्यावर एसआयटीने आता दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी शिंदे याची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाले होते. पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात एकच गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या या भूमिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले.  त्यामुळे आता एसआयटीच्या सल्ल्यानुसार, दुसऱ्या पीडित मुलीच्या बाबत घडलेल्या गुन्ह्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी शिंदे हा न्यायालयीन कोठडीत असून, आता दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे पुन्हा त्याला पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

...त्याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवला नव्हताज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळेतील एका पालकाला आपली मुलगी शाळेत जाण्यास घाबरत असल्यामुळे संशय आला होता. त्यांच्या मुलीबाबत काहीतरी चुकीचे घडले आहे याची कल्पना त्यांना आली होती. संबंधित पालकांनी दुसऱ्या विद्यार्थिनीच्या आजोबांना त्याची कल्पना दिली. त्यामुळे आजोबांनीही आपल्या नातीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यासोबत अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर दुसऱ्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात ज्या चिमुकलीवर सर्वप्रथम अत्याचार झाले त्याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवला नव्हता. आता एसआयटीने दोन्ही अत्याचाराच्या घटनेचे स्वतंत्र गुन्हे नोंदवले.

टॅग्स :badlapurबदलापूर