शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी सरकारने धुवून काढले - चंद्रशेखर बावनकुळे 

By नितीन पंडित | Updated: October 28, 2023 17:30 IST

या संवाद कार्यक्रमाची सुरुवात भिवंडीतील काल्हेर येथे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

नितीन पंडित

भिवंडी : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकी साठी कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघ निहाय महाविजय २०२४ संकल्प दौरा कार्यक्रम राबविला जात असून यानिमित्त आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात व जल्लोषात स्वागत केला. या संवाद कार्यक्रमाची सुरुवात भिवंडीतील काल्हेर येथे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोपर ,पूर्णा येथेही बावनकुळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनतर शहरातील पद्मानगर भाजी मार्केट येथील भाजी व फळ विक्रेते, किराणा दुकानदार, उज्वला गॅस योजना, नाका कामगार, आयुष्यमान भारत, स्वनिधी लाभार्थी, मोफत धान्य मिळणारे लाभार्थी यांच्याशी संवाद साधत त्यांना २०२४ मध्ये प्रधानमंत्री कोण हवेत, अशी विचारणा बावनकुळे यांनी केली. 

या संवाद यात्रेचा समारोप पद्मानगर संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेर झालेल्या सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंडिया आघाडीवर टिका करत मुंबई येथे २८ पक्षांच्या इंडिया आघाडीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सभेवर देखील टिका करत राज्यात मोदी यांच्या नेतृत्वाला भरघोस प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये भिवंडी लोकसभेमधील संवाद यात्रा ही २३ वी आहे, असे सांगत भिवंडीत ८१४ तर राज्यात तब्बल ३५ हजार नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये फक्त १३ जणांनी मोदी व्यतिरिक्त इतर व्यक्तीचे नाव घेतले, अशी माहिती दिली.

काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धुवून काढले असे सांगत देशाला विश्वात महeसत्ता बनविण्या साठी २०२४ मध्ये महाराष्ट्रात ४५ प्लस खासदार निवडून देण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी केले. तर या प्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिर दर्शनासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ५० हजार नागरिकांना घेवून जाण्याचा संकल्प बोलून दाखविला. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेbhiwandiभिवंडी