शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्येच भरली शाळा, गिरवताहेत बाराखडी; वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ‘समतोल’ उपक्रम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 2, 2024 13:26 IST

‘स्कूल इन बस’ ही संकल्पना ‘समतोल’ने राबविली असून, चक्क बसमध्ये ही मुले शिकत आहेत.

ठाणे : रोजीरोटीसाठी वीटभट्टी कामगारांना सातत्याने स्थलांतरित व्हावे लागते. त्यामुळे वीटभट्टी कामगारांची कितीतरी मुले शाळाबाह्य आहेत. याच मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी समतोल फाउंडेशनने चक्क शाळाच त्यांच्या दारी नेली आहे. ‘स्कूल इन बस’ ही संकल्पना ‘समतोल’ने राबविली असून, चक्क बसमध्ये ही मुले शिकत आहेत.

मुरबाडमध्ये ८० वीटभट्ट्या आहेत. हे कामगार आपल्या मुलांना शाळेत पाठवतीलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे ‘स्कूल इन बस’च्या माध्यमातून शाळाच या मुलांच्या दारात नेली, अशी माहिती संस्थेचे सर्वेसर्वा विजय जाधव यांनी दिली. सध्या २५० मुलांपर्यंत पोहोचण्यात संस्थेला यश आले आहे. 

ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न तसाच आहे. त्याकडे सरकार कधी पाहणार? आणि अशा मुलांसाठी संस्था तरी किती पुरी पडणार, असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला. या मुलांच्या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारला होता. मात्र, अद्याप त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, असे जाधव यांनी सांगितले.

तीन तासांची शाळापालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना तारेवरची कसरत करावी लागली. गेल्या वर्षभरात २५० मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, यात ४५ मुलींचा समावेश आहे. या बसला शाळेसारखे स्वरूप दिले आहे. बेंच, बोर्ड, दप्तर सारेच यात आहेत. यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहेत. ही शाळा तीन तास चालते आणि दिवसातून पाच ठिकाणी जाते.

८०० मुले शाळाबाह्यशिक्षण मिळणे हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, असे असतानाही कितीतरी मुले ही शाळाबाह्य आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचा दावा सरकारने केला असला, तरी शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी असल्याचे स्वयंसेवी संघटनांचे म्हणणे आहे. या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. मुरबाड तालुक्यातील वेगवेगळ्या पाड्यांमध्ये वीटभट्टी कामगार स्थलांतरित झाले आहेत.  स्थलांतरामुळे जवळपास ८०० मुले ही शाळाबाह्य आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी