शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेवर जाणार समान महिला आणि पुरुष; तीन सदस्यीय पध्दतीने होणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:50 IST

५० टक्के आरक्षणानुसार ७१ जागा या महिलांसाठी राखीव आहेत.

ठाणे- ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या तीन सदस्यीय पध्दतीने होणार आहेत. मंगळवारी प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत प्रस्थापितांना कुठेही धक्का बसला नसल्याचे दिसून आले आहे. ठाणो महापालिकेने आगामी सार्वित्रक निवडणुकीसाठी महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहिर केली. 

यामध्ये अनुसुचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी २ आणि सर्वसाधारण खुल्या गटासाठी १७ जागा चिठ्ठ्या काढून महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या. रक्षणाच्या या आकडेमोडीत तीन पॅनलच्या (अपवाद चार पॅनलचा प्रभाग ४२) एकूण ४७ प्रभागांपैकी २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. असे असले तरी पालिकेवर ७१ महिला आणि ७१ पुरुष निवडून जाणार असल्याचे दिसत आहे.

डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठी काढत हे आरक्षण जाहिर करण्यात आले. ठाणे महापालिकेने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठ्या काढल्या गेल्या. यंदा त्रिसदस्य पॅनलपद्धतीने निवडणूक होणार असून १४२ नगरसेवक निवडून येणार आहेत. ५० टक्के आरक्षणानुसार ७१ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर एकूण जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १०, अनुसूचित जमातींससाठी ३ जागा राखीव आहेत. त्यातील महिलांच्या अनुसूचित जातींसाठी ५ व जमातींसाठी २ जागांचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आरक्षण सोडत करण्यात आली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार असल्याने हा ‘कोटा’ सर्वसाधारण गटामध्ये वळवण्यात आला आहे. तर तिसऱ्या टप्यात महिलांच्या १७ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. 

अनुसूचित जातींचे आरक्षण -निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी ३, १०,१२,१५,२३,२४,२७,२९,३४ आणि ३४ या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी ३, १२,१५,२३ आणि २९ प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

अनुसूचित जमातींचे आरक्षणअनुसूचित जमातींसाठी ५ अ, ६ अ आणि २९ ब हे प्रभाग निवडणूक आयोगोने थेट आरक्षित केले होते. त्यापैकी ५ अ आणि २९ ब हे दोन प्रभाग अनु. जमातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.

महिलांचा खुला प्रवर्ग१४२ पैकी ७१ जागांवर महिला निवडून येणार आहेत.  ६४ जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी खुल्या आहे. त्यापैकी ४७ जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. उर्वरित १७ जागांसाठी चिठ्ठीद्वारे महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४२ सह एकूण १८ प्रभागांमध्ये सर्वसाधरण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह ६ प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडणून येणार आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूकWomenमहिलाthaneठाणे