शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त

By सदानंद नाईक | Updated: October 7, 2025 20:31 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन

सदानंद नाईक, उल्हासनगर: पावसाळ्यात ठप्प पडलेल्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी आमदार कुमार आयलानी यांना रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.

उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्ता बांधणीसाठी राज्य शासनाने तीन टप्प्यात ६८ कोटींचा निधी मंजूर केला. मात्र रस्त्याचे काम गेल्या ३ वर्षापासून रखडल्याने, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांच्या कारभारावर टिका होत आहे. शहरांत सुरू असलेल्या ४५० कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यावर कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काम सुरू करतो. असे सांगणारे मानकर यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम सुरू केले होते. तर पावसाळा सुरू होताच रस्त्याचे काम बंद केले. आमदार कुमार आयलानी यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका बांधकाम विभाग यांची सोमवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीत शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून अधिकाऱ्यांना आयलानी यांनी धारेवर धरले.

शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्यात जीवघेणे खड्डे झाले असून ट्रक व टेम्पोचे चाके रस्त्यात फसल्याच्या घटना घडल्या आहेत. आमदार आयलानी यांनी घेतलेल्या. बैठकीत रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी दिले. तसेच २० कोटीतील नागरी सुविधेची २०० कामाला मुहूर्त लागणार असल्याचे मानकर म्हणाले. शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत महापालिका शहर अभियंता निलेश शिरसाठे यांना उत्तर देता आले नाही. शिरसाठे यांना आमदार आयलानी यांनी चांगलेच धारेवार धरले. त्यांच्या मदतीला कार्यकारी अभियंता संदीप जाधव धावून गेले. रस्त्याचे कामे व समस्या आमदार आयलानी यांना जाधव यांनी समजावून सांगितल्या. एकूणच दिवाळीत रस्ते सुसाट होणार असल्याचे संकेत आमदार आयलानी यांनी बैठकीत देऊन अधिकाऱ्यांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan-Ambernath Road Construction Finally Resumes After 3 Years Delay

Web Summary : Delayed Kalyan-Ambernath road work restarts after MLA's intervention. The project, stalled for three years due to administrative issues, is now promised to resume next week. Officials faced scrutiny over poor road conditions and project delays during a recent meeting, with assurances of expedited progress.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर