शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता महापालिकेची, पण वसूली नवरात्री आयोजकाची, मीरा-भाईंदरमधील प्रकार 

By धीरज परब | Updated: October 5, 2022 21:37 IST

भाईंदर पश्चिमेच्या उड्डाण पूल खालून अग्निशमन केंद्रा कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोटस नावाने ईस्ट वेस्ट फाउंडेशन ने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या उड्डाणपूल खालून अग्निशमन दला कडे जाणाऱ्या महापालिकेच्या रस्त्यावर वाहन पार्किंग शुल्क मात्र नवरात्र आयोजकाच्या पावत्या देऊन वसूल केले गेल्याचा प्रकार समोर आला आहे . गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या लोकां कडून मोठ्या प्रमाणात हि शुल्क वसुली केली गेल्याने गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी होत आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या उड्डाण पूल खालून अग्निशमन केंद्रा कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोटस नावाने ईस्ट वेस्ट फाउंडेशन ने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी नवरात्रीचा येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्ये मुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती . या प्रकरणी लोकांनी संताप व्यक्त करत पुरेसा रस्ता , वाहन पार्किंग व वाहतूक नियोजनाची तरतूद केल्याची खात्री केल्या शिवाय पोलीस आणि महापालिका प्रशासन परवानग्या देतेच कशी ? असा सवाल करत कारवाईची मागणी होत आहे.  तर राजकीय वा व्यावसायिक फायद्यासाठी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यां मुळे वाहतूक समस्या गंभीर बनत असताना पोलीस कर्मचारी अश्या कार्यक्रमांच्या वाहतूक व्यवस्थे साठी लावणे चुकीचे असल्याची टीका होत आहे. 

आता या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांवर प्रति दुचाकी पार्किंग साठी ३० रुपये प्रमाणे लोटस नवरात्री नावाने पावत्या देऊन मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग शुल्क वसुली केली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या रस्त्यावर लोटस नवरात्रीच्या नावाने पार्किंग शुल्क कसे वसूल करता ? यावर लोटस नवरात्रीची पावती दाखवत आम्ही पगार वर आहोत आणि लोटस वाल्यांचे पार्किंग आहे असे तो व्यक्ती म्हणाला. दुचाकी साठी ३० रुपये आणि चारचाकी साठी ५० रुपये शुल्क घेत असून संदीप भाई आणि अकील भाई ने बोला आहे असे सुद्धा त्याने सांगितले . दुसऱ्या इसमाने देखील आम्ही पावती नुसार पैसे घेतोय असे म्हटले. 

नवरात्रीसाठी येणाऱ्या लोकां कडून रस्ता पालिकेचा असताना पार्किंगच्या नावाने मोठ्या प्रमाणात लूट केली गेल्याचा हा प्रकार असून पार्किंग शुल्क वसूल करायला कोणी परवानगी दिली ? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत . या प्रकरणी पोलीस आणि पालिका संबंधितांवर गुन्हा दाखल करून आता पर्यंत वसूल केलेल्या पार्किंग शुल्काची रक्कम लोकांना परत करणार का ? असे प्रश्न केले जात आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरNavratriनवरात्री