शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय 'देखावा' चर्चेत, खरी शिवसेना कोणाची सांगताना ठाकरेंवरच हल्लाबोल

By अजित मांडके | Updated: September 5, 2022 18:27 IST

या ठिकाणी  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद का स्वीकारले? या विषयीचा इतिहास या फितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे.

ठाणे  : खरी शिवसेना कोणाची यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मात्र आता याच मुद्यावरुन ठाण्यातील वागळे इस्टेट भागात गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या देखाव्यावर सध्या सर्वाच्याच नजरा रोखल्या आहेत. याठिकाणी खरी शिवसेना कोणाची यावर आधारीत देखावा साकारण्यात आला असून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, दिघे यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इतिहास दाखविण्याबरोबर अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे यांच्यावर टिका देखील केल्याचे दिसत आहे. 

या ठिकाणी  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद का स्वीकारले? या विषयीचा इतिहास या फितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. त्यामुळे  बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिवसेना कशी होती आणि आता कशी आहे? आणि खरी शिवसेना कोणाची? हे देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी बरोबर शिवसेना का गेली होती? बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेची भूमिका कशी होती? त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका कशी होती? हे सगळे प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच या फितीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.या देखाव्याच्या माध्यमातून केवळ सत्य दाखवण्याचा प्रयन्त करण्यात आला असल्याचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी स्पष्ट केले आहे.           आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे शिष्य असून खरे शिवसैनिक असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आपल्या सोबत घेत थेट शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात दंड थोपटले. त्यानंतर आम्ही शिवसैनिक असल्याचे सांगत भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषविले. मात्र यानंतर शिवसेना कोणाची? यावरून वाद निर्माण होऊन त्यासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू झाली. मात्र खरी शिवसेना कोणाची? हे जनतेला दाखवून देण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील भवानीनगर येथील सार्वजनिक मंडळाने खरी शिवसेना कोणाची? हे अधोरेखित करणारी ध्वनी चित्रफित सादर केली आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा तयार करण्यात आला असून सध्या हा देखावा सर्वांचाच चर्चेचा विषय झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे