शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांनी स्वतःच्या जमिनींवर चालवलेला व्यवसाय पालिका आकसाने करतेय उध्वस्त; ठाकरे गटाचा आरोप

By धीरज परब | Updated: December 4, 2022 18:19 IST

जागा भूमिपुत्रांच्या मालकीच्या असून असून पालिका आरक्षण आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील काही अधिकारी हे आकस ठेऊन भूमिपुत्रांना त्यांच्याच जमिनीवर व्यवसाय करण्यास मनाई करून त्यांचे व्यवसाय उद्धवस्त करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. 

मीरारोडच्या कनकीया परिसरात असलेल्या नरेंद्र पाटील आदी स्थानिक भूमिपुत्रांच्या मालकीच्या जमिनी आहेत . त्यावर महापालिकेच्या विकास आराखड्यात शाळा आदींचे आरक्षण असले तरी पालिकेने जागा अजून मोबदला देऊन ताब्यात न घेतल्याने त्या मोकळ्या जागेवर स्थानिक आगरी समाजातील तरुणांनी तात्पुरत्या स्वरूपात हॉटेल, टर्फ असा व्यवसाय सुरु केला होता. महापालिकेने कोणतीच नोटीस न देता अचानक येऊन सर्व शेड , टर्फ तोडून टाकत नुकसान केल्याचा आरोप ठाकरे गट युवासेनेचे मीरा भाईंदर प्रमुख पवन घरत आदींनी केला. 

महापालिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचे ह्यातून स्पष्ट होत असून ह्या आधी राज्यातील सत्तांतर नंतर जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे , जिल्हा संघटक स्नेहल सावंत , उपजिल्हा प्रमुख शंकर वीरकर यांच्या मालकी जागेतील कच्ची - पक्की बांधकामे अचानक जाऊन तोडण्यात आली. आता घरत यांच्याशी संबंधित शेड आदींवर कारवाई केली गेली असे ठाकरे गटा कडून सांगण्यात आले. 

जागा भूमिपुत्रांच्या मालकीच्या असून असून पालिका आरक्षण आहे. तर पालिकेने मोबदला देऊन त्या ताब्यात घ्याव्यात. परंतु आमच्या जागा आणि मोबदला द्यायचा नाही वर आम्हाला व्यवसाय सुद्धा करू द्यायचा नाही हा स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय आहे. आकस व सूडबुद्धीने केवळ ठाकरे गटास लक्ष्य करणे पालिकेने थांबवावे व कारवाई करायची तर रीतसर नोटीस व मुदत द्या, नुकसान जाणीवपूर्वक करू नका .  शहरातील अन्य बेकायदा कामांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी पवन घरत यांनी केली. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकthaneठाणे