शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा मंडपावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ अन् भ्रष्टाचाराचे आरोप 

By धीरज परब | Updated: August 27, 2022 21:38 IST

मीरारोडच्या हटकेश, सालसर गार्डन येथील उज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतले.

मीरारोड - मीरारोडच्या हाटकेश भागात अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचे काम सुरू असल्याने कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोर जावे लागले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. 

मीरारोडच्या हटकेश, सालसर गार्डन येथील उज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतले. काशीमीरा पोलिसांनी प्रभाग समिती ४ ला २५ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून , सदर मंडळाने अर्ज केला असला तरी  अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवरखाली मंडप धोकादायक ठिकाण असल्याने मंडळास अन्य जागी मंडप उभारण्यास आवाहन करण्याचे पत्र दिले होते. 

पोलिसांच्या पत्रानंतर प्रभाग समिती ४ चे पालिका पथक हे महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांसह शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी  मंडपाच्या ठिकाणी जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंडप काढण्या बाबत सांगत होते. त्यावेळी आकाश गोपाळ दुबे रा. एस्टर, सैलसर गार्डन ह्याने पालिका पथकास अरेरावी करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. दुबेसह आणखी एका वयस्कर इसमाने पालिकेवर पैसे खाण्याचे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही, एका क्लब वाल्या कडून पैसे खाऊन कारवाई करतात आदी स्वरूपाचे आरोप मोठमोठ्याने ओरडून केले. यामुळे परिसरात गर्दी जमून तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

पालिकेचे कर्मचारी महेंद्र गावंड यांच्या फिर्यादी वरून आकाश दुबेवर सरकारी कामात अडथळा तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान महापालिकेसह वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांची परवानगी आल्या शिवाय मंडप उभारण्याचे काम करता येत नसताना देखील बेकायदा मंडप उभारण्याचे काम आधीच सुरु केले जात असल्याने महापालिका पथक व पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यास असले तणावाचे प्रसंग टाळता येऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे.  

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणेGaneshotsavगणेशोत्सव