शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये शिरुन व्यावसायिकाची हत्या करणारे अटकेत

By अजित मांडके | Updated: December 11, 2023 17:18 IST

हत्या झालेल्यांचे नाव सतीश पाटील असे असून ते पेशाने व्यावसायिक असून ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहतात.

ठाणे :  घोडबंदर भागात शनिवारी रात्री एका व्यावसायिकाची कारमध्ये शिरुन हत्या करणाºया कर सल्लागार भूषण पाटील त्याचा साथिदार नितीन पाटील या दोघांना कासारवडली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून त्यांनी हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्या झाली तेव्हा भूषण पाटील हा त्या व्यवसायिकासोबत कारमध्ये सोबत होता. संशय येऊ नये म्हणून त्याने हल्लेखोरांकडून स्वत:वर देखील हल्ला करवून घेतला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.  त्यात आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्यानेच कासारवडवली पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली होती.

हत्या झालेल्यांचे नाव सतीश पाटील असे असून ते पेशाने व्यावसायिक असून ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहतात. शनिवारी रात्री सतीश हे त्यांच्या कारने ओवळा भागात आले होते. त्यावेळी कारमध्ये भूषण आणि नितीन होता. काहीवेळाने भूषण याने मोटार चालविण्यास घेतली. ओवळा येथील विहंग व्हॅली चौकात आले असता, भूषण हे कामानिमित्ताने गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी दुचाकीवरून दोनजण त्याठिकाणी आले. त्यांनी सतीश यांची कारमध्ये शिरून धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली.

हल्लेखोरांनी भूषण यांच्या हातावर देखील वार केले. नितीन हा त्याठिकाणाहून पळून गेला. याप्रकरणी भूषण याने तक्रार दाखल केल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कासारवडवली पोलिसांचे पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भूषण याची कसून चौकशी केली असता, त्याने दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून सतीश यांची हत्येची सुपारी दिल्याचे कबूल केले. तसेच संशय येऊ नये म्हणून हल्लेखोरांकडून स्वत:वरही वार करवून घेतले. त्यानंतर नितीन याला देखील ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कासरवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी