शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

भरधाव कंटेनर ट्रकवर आदळला, रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:11 IST

कंटनेर चालक राजेंद्र सावंत हे घोडबंदर रोडने जात असताना, वाघबीळ पुलाजवळ त्यांचा कंटेनरवरील नियंत्रण हरवले

ठाणे : कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने या कंटेनरने घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणाऱ्या रोडवरील ट्रकला जोरदार धडक दिली. ट्रक घोडबंदर रोडवर उलटून ट्रकमधील तेल रस्त्यावर सांडले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाघबीळ पुलाजवळ हा अपघात घडला. 

कंटनेर चालक राजेंद्र सावंत हे घोडबंदर रोडने जात असताना, वाघबीळ पुलाजवळ त्यांचा कंटेनरवरील नियंत्रण हरवले. त्यामुळे तो कंटेनर घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे जाणाऱ्या रोडवरील ट्रकला जाऊन धडकला. ही धडक जोरदार असल्याने ट्रक घोडबंदर रोडवर मधोमध उलटला. ट्रकमधील तेल रस्त्यावर सांडल्याने ठाण्याकडे येणारी वाहतूक थांबविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच कासारवडवली वाहतूक पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी किरकोळ जखमी झालेला ट्रक चालक सिद्धेश्वर गिरी याला खासगी रुग्णालयात दाखल केले. हायड्रा मशीनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रकला रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या तेलावर पाण्याचा मारा करून माती पसरविण्यात आली. त्यानंतर घोडबंदर-ठाणे रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. 

दरम्यान, साधारणत: पाऊण ते एक तासातानंतर वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती कासारवडवली वाहतूक उपशाखेचे पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात