शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

फेरीवाल्यांच्या वादातून घडलेल्या हत्याकांडातील गोळी झाडणारा फेरीवाला पंजाब मधून ४ महिन्यांनी अटकेत 

By धीरज परब | Updated: May 5, 2025 21:11 IST

Mira Road News: मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या वादातून एकाची डोक्यात गोळीझाडून हत्या करणारा हल्लेखोर फेरीवाल्यास ४ महिन्यांनी पंजाब मधून अटक करण्यात खंडणी विरोधी पथकास यश आले आहे.

मीरारोड - मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या वादातून एकाची डोक्यात गोळीझाडून हत्या करणारा हल्लेखोर फेरीवाल्यास ४ महिन्यांनी पंजाब मधून अटक करण्यात खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. मीरारोड रेल्वे स्थानक परिसर, सार्वजनिक रस्ते व स्कायवॉक वर फेरीवाले बसवण्या पासून जागा आणि भाडे उकळणे ह्या सारखे प्रकार चालले होते. फेरीवाल्यांच्या ह्या वादातून नया नगर पोलीस ठाण्यात काही गुन्हे देखील दाखल झाले होते.

त्यातूनच शुक्रवार ३ जानेवारीच्या रात्री शांती शॉपिंग सेंटर मध्ये  शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी उर्फ सोनू ( ३५ ) ह्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती . या प्रकरणी फेरीवाला मोहम्मद युसूफ मन्सूरअली आलम ( वय ३४ वर्षे ) रा . नया नगर , मीरारोड,  सैफअली मन्सूरअली खान ( वय २२ ) व तबस्सुम परवीन उर्फ शमा  रा . नालासोपारा ह्या तिघांना अटक केली होती.   शमा हिने सैफ ह्याला शस्त्रा सहतिच्या घरात लपवून ठेवले होते व घरातून देशी बनावटीची पिस्तूल,  ६ जिवंत बुलेट जप्त केली गेली होती.

सोनूवर गोळी झाडणारा फेरीवाला सचिन कुमार साहू उर्फ राठोड ह्याचा मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ठिकठिकाणी शोध घेत होती. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. साहू हा मीरारोड रेल्वे स्थानक जवळ भेलपुरीचा धंदा लावायचा. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या मार्गदर्शनाखाली देखील साहू ह्याला पकडण्यासाठी शोधकार्य सुरु होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे सह शकील पठाण, राजवीर संधु यांचे तपास पथक काम करत होते.

पोलिसांनी गोपनीय माहिती सह तांत्रिक विश्लेषणावर मेहनत घेतली. सातत्याच्या प्रयत्ना नंतर साहू ह्याच्या गावच्या आणि नया नगर भागातील एकास पंजाबच्या भटिंडा येथून नेहमी कॉल येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना खात्री पटताच ४ मे रोजी पोलिसांचे पथक पंजाबच्या भटिंडा येथील तलवंडी साबो गावात स्थानिक पोलिसांसह दाखल झाले.तेथे एकास साहू ह्याचा फोटो दाखवताच त्याने पोलिसांना साहू राहत असलेल्या वीटभट्टीवर नेले. साहू हा झोपेत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. साहू हा हत्या करून आला आहे याची माहिती तेथील काही कामगारांना होती असे सूत्रांनी सांगितले.

हत्या केल्या नंतर तो अनेक ठिकाणी पळत फिरत होता. गेल्या सव्वा दोन महिन्या पासून तो सदर वीटभट्टी येथे राहत होता. तेथे मिळेल ते काम करायचा. खंडणी विरोधी पथकाने त्याला पंजाब वरून अटक करून आणत मीरा भाईंदर गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले आहे. युसूफ ने सांगितले म्हणून सोनूला ठोकून टाकले. शस्त्र देखील युसुफने पुरवले होते असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. युसुफच्या सोबत असलेल्या मैत्री खातर कि सुपारी घेऊन साहू ह्याने हत्या केली ? हे अजून स्पष्ट झालेले नाही.  

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी