भिवंडीत ईद ए मिलादुन्नबीची विशाल शोभायात्रा शांततेत संपन्न

By नितीन पंडित | Published: September 29, 2023 07:49 PM2023-09-29T19:49:59+5:302023-09-29T19:50:06+5:30

या मिरवणुकी निमित्त भिवंडी पोलीस प्रशासनाने चोख असा बंदोबस्त ठेवला होती.

The grand procession of Eid-e-Miladunnabi in Bhiwandi ended peacefully | भिवंडीत ईद ए मिलादुन्नबीची विशाल शोभायात्रा शांततेत संपन्न

भिवंडीत ईद ए मिलादुन्नबीची विशाल शोभायात्रा शांततेत संपन्न

googlenewsNext

भिवंडी : मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा ईद - ए - मिलादुन्नबी निमित्त शुक्रवारी सायंकाळी कोटर गेट येथून सुरू झालेल्या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने मुस्लिम धर्मीय आपल्या हाती झेंडे घेऊन सहभागी झाले होते.ईद ए मिलादुन्नबी निमित्त संपूर्ण शहरातील नागरीक कोटरगेट येथील सुन्नी जामा मस्जिद येथे एकत्रित होत असून ते मामाभांजा येथील दर्गा ग्राऊंड येथे पर्यंत शोभायात्रेने जात असतात.

या कार्यक्रमाचा शुभारंभ कोटर गेट मस्जिद येथे करण्यात आला.या मिरवणुकीस प्रमुख धार्मिक उपदेशक म्हणून उत्तर प्रदेश बरेली शरीफ येथील मौलाना अल्लमा तोसिफ रजा खान हे उपस्थित होते.त्यांना बग्गीत बसण्याचा मान देण्यात आला.याप्रसंगी आमदार रईस शेख,पालिका आयुक्त अजय वैद्य,पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,माजी आमदार रशीद मोमीन,सपा प्रदेश सचिव रियाज आजमी,युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल पाटील,जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या मिरवणुकी निमित्त भिवंडी पोलीस प्रशासनाने चोख असा बंदोबस्त ठेवला होती.

यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने नागरिकांना पाणी ,सरबत वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.या मिरवणुकीत भिवंडी शहरातील लाखो मुस्लिम धर्मीय नागरिक सहभागी झाले होते .तर हि मिरवणूक कार्यक्रम यशस्वी करण्या साठी रजा अकादमीचे शकील रजा ,शर्जिल रजा व त्यांच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: The grand procession of Eid-e-Miladunnabi in Bhiwandi ended peacefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.