शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ठाण्यातील गडकिल्ले प्रतिकृती विजेते धडकले ईगतपुरीच्या किल्ले त्रिंगल वाडीच्या किल्यावर!

By सुरेश लोखंडे | Updated: December 26, 2023 18:53 IST

ठाण्यातील या गडकिल्ले प्रेमीं प्रतिकृती स्पर्धेचे हे यंदाचे १३ वे वर्ष आहे.

ठाणे  : येथील महापालिकेचे माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि माजी नगरसेविका रुचिता मोरे यांनी त्यांच्या प्रभागामधील गडकिल्ले प्रेमींसाठी गडे किल्ले बनविण्याची स्पर्धा घेतली होती. त्यातील विजेत्या स्पर्धकांना त्यांनी थेट ईगतपुरीच्या जवळील किल्ले त्रिंगल वाडी या किल्ल्याची सफर करवली, असे आयोजक मोरे यांनी लोकमतला सांगितले.

ठाण्यातील या गडकिल्ले प्रेमीं प्रतिकृती स्पर्धेचे हे यंदाचे १३ वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी.महाराजांचा इतिहास मुलांना समजावा यासाठी प्रत्येक वर्षी स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा महाराजांच्या गड किल्ल्यावरती करण्यात येतो. त्यानुसार आज रात्री हा किला या विजेत्यांनी सर केला आहे. यंदाच्या दिवाळी सुट्टीत प्रभागातील अनेक मुलांनी आणि मंडळांनी एकत्र येत किल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३०० स्पर्धकांना आज सकाळी बसने मोफत नेण्यात आले. तेथे गेल्यावर प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, उत्कृष्ट बांधणी, अपरिचित दुर्ग आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, ऐतिहासिक पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

‌सलगच्या तीन दिवस सुट्यांमुळे अनेक पर्यटक पर्यटनाला बाहेर पडल्यामुळे किल्ल्यापर्यंत पोचायला प्रचंड ट्रॅफिक लागली. किल्ल्यावर पोचायला साधारण दुपार झाली. मुलांनी जोषात किल्ला सर करायला सुरुवात केली, तोपर्यंत संध्याकाळ झाली. किल्ल्यावर असलेल्या जैन लेणी येथे पारितोषिक वितरण समारंभ संध्याकाळच्या मावळतीला संपन झाला. हळुहळू अंधार व्हायला सुरुवात झाली. तरीही, सर्वच मुलं उत्साही होती. सर्व मुलांच्या चेह-यावर आनंद घेत रात्रीच्या गडद अंधारात चांदण्याच्या प्रकाशात मुलं किल्ल्यावरुन खादी सुखरुप उतरली. इगतपुरी येथील त्रिंगल वाडी किल्ल्याचा इतिहास शिल्पा परब  यांनी यावेळी सांगितला. बालशाहिर सौजस मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. 

टॅग्स :Fortगड