शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

... जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द ठेवली पाहिजे -कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: September 10, 2022 20:22 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत - कपिल पाटील

भिवंडी - सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अनेक योजना राबवत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची जिद्द अंगी बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी केले.श निवारी ते भिवंडी पंचायत समिती सभागृहात शासनाच्या ठाणे कृषी विभाग व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,पंचायत समिती सभापती सुरेंद्र भोईर,जिल्हा कृषी अधीक्षक दीपक खुटे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक हंसराज गंगवाल व मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सतत शेतीला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित आले आहेत.पूर्वी ५० टक्के नुकसान झाले तरच विमा संरक्षण मिळत होत परंतु मोदी सरकारने ती मर्यादा कमी करून ३३ टक्क्यांवर आणून त्यासाठी संसदेत कायदा केला. देशातला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर या सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्याला देऊन त्याचे शेती उत्पन्न दुप्पट कसे करता येईल यासाठी केंद्र शासना कडून  प्रयत्न केला जात आहेत.मात्र सरकारने केले म्हणजे आपली जबाबदारी संपली नसून शेतकऱ्याने अधिक कष्ट करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे ,पूर्वी आपल्या कडील शेतकरी भातशेती नंतर भाजीपाला पिकवून ती विक्री करत असल्याचे चित्र आपण पाहत होतो, पण आज आळसावलेल्या शेतकऱ्यांमुळे मुबंईसह ठाणे पालघर या राज्यातील २२ टक्के लोकसंख्या असलेल्या भागातील नागरिकांच्या गरजा पुणे कोल्हापूर नाशिक जळगाव अहमदनगर येथील शेतकरी पूर्ण करतात.त्यांना दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून आपल्या येथे आणून विक्री करणे परवडते मग आपल्याला का नाही परवडणार याचा विचार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.विमा संरक्षण मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय उभारावेत असे आवाहन कपिल पाटील यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमादरम्यान युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी पैसे भरले आहेत त्यांना त्यांच्या विमा पॉलिसीचे मेरी पॉलिसी मेरे हात या अभियाना अंतर्गत वितरण करण्यात आले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbhiwandiभिवंडी