शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बंद घरात आढळले कुटुंबातील तिघांचे मृतदेह; वाड्यात खळबळ; हत्याकांडाची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 08:57 IST

बाथरूमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला.  घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा : वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एका बंद घरात तीन मृतदेह आढळून आले असून, या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान, या हत्या की आत्महत्या, याबाबतचे गूढ वाढले असून, वाडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अधिक तपास करत आहेत. मुकुंद बेचलदास राठोड (वय ७०), पत्नी कांचन मुकुंद राठोड (वय ६९) व मुलगी संगीता मुकुंद राठोड (५१) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

नेहरोली येथील बोंद्रे आळीत मुकुंद बेचलदास राठोड (७०) यांनी २५ वर्षांपूर्वी स्वतः जागा घेऊन एक इमारत बांधली होती. या इमारतीत भाडेकरूसह ते स्वतः पत्नी आणि मुलीसमवेत राहत होते. त्यांची दोन मुले सध्या मुंबईत राहतात. आठ दिवसांपासून वडील, आई व बहिणीचा संपर्क न झाल्याने राठोड यांचा मुलगा सुहास शुक्रवारी दुपारी नेहरोली येथे आला. तेव्हा हा प्रकार उघड झाला. वाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देताच,  बाथरूमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला.  घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला. ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याने प्रेताला दुर्गंधी सुटली होती. एकूण परिस्थिती पाहून हे तिहेरी हत्याकांड असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. 

या आत्महत्या की हत्या आहेत, याबाबतचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या संदर्भात वाड्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता, मी बंदोबस्तासाठी पालघर येथे होतो. आता तिथे गेल्यानंतर मी अधिक माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी