शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही’, उज्ज्वल निकम यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:39 IST

Ujjwal Nikam : मी वकिली क्षेत्रात आल्यानंतर आपण गुन्हेगारीविरुद्ध लढायचे, असे ठरवले. मी आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही. मी गुन्हेगारांविरोधातच लढत आलो आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी व्यक्त केले. 

 ठाणे - मी वकिली क्षेत्रात आल्यानंतर आपण गुन्हेगारीविरुद्ध लढायचे, असे ठरवले. मी आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही. मी गुन्हेगारांविरोधातच लढत आलो आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी व्यक्त केले. 

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेतर्फे आयोजित करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, न्यायाधीशांसमोर बोलताना वकिलाच्या आवाजात चढ-उतार असायला हवा. सामान्य माणूस जेव्हा वकिलाकडे येतो, तेव्हा अशिलाला प्रामाणिक सल्ला देणे हे वकिलाचे कर्तव्य आहे. खोटी आश्वासने देऊन फसवू नये.  कसाबच्या खटल्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, कसाबला फाशी देणे हे माझ्या दृष्टीने आव्हानात्मक नव्हते. हा दहशतवाद कोणी घडवला, यामागे कोणाची ताकद होती, हे जगाला समजले पाहिजे, म्हणून हा खटला इन कॅमेरा चालवायचा नाही, असे ठरवले. विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक, तर विश्वस्त मकरंद जोशी यांनी निवेदन केले.

मृत्यूबाबत पाकिस्तानने शंका घेतली नाहीमी जेव्हा लोकसभा निवडणुकीला उभा होतो, तेव्हा काही नेत्यांनी माझ्यावर मुक्ताफळे उधळली. कसाबने पोलिस अधिकाऱ्यांना मारले नाही, त्यांना दुसऱ्याने, आपल्याच भारतीयांनी मारले, असे त्यांच्याकडून सांगितले जात होते. त्यावेळी मी त्यांचा समाचार घेतला. कसाबला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्ताननेही शंका उपस्थित केली नाही, पण आमच्यातील काही महाभागांनी ती उपस्थित केली, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमthaneठाणे