शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हात भाजलेल्या लहानग्या रुद्रांशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:22 IST

म्हस्के यांची प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला पाहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली रविवारी किसननगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी एक आई आपल्या जखमी मुलाला घेऊन रस्त्याने चाललेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिसली. त्या आईच्या खांद्यावर एक मूल, तर दुसरे मूल हातात होते. मुख्यमंत्र्यांनी त्या माउलीची अडचण जाणून घेत रॅली सोडून ते तिच्या मदतीला धावून गेले. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा आगळा-वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला. 

म्हस्के यांची प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला पाहिले. त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्याच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले. रुद्रांश रोनित चौधरी असे या नऊ वर्षांच्या मुलाचे नाव होते. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले.

रुद्रांश चौधरी या जखमी मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्याच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे